अकिवाट / महान कार्य वृत्तसेवा
सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन, आपला ग्रामपंचायतस्तरीय “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार” अकिवाट(ता.शिरोळ) ग्रामपंचायतीने भाग्यश्री मिठारे यांना सन्मानित केले.
भाग्यश्री मिठारे या जिल्हा परिषद शाळा नंबर ३ या शाळेचे शालेय शिक्षण समितीच्या उपाध्यक्ष असताना परिसरातील नागरिकांना जिल्हा परिषद शाळा शिक्षणाचे महत्त्व पटवून शाळेची गुणात्मक व संख्यात्मक वाढ केली आहे त्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. महिलांना आर्थिक बचतीचे सवय व्हावे व त्यांची आर्थिक नड निघावी यासाठी साई महिला बचतगट, गुरूदत्त महिला बचतगट व श्री महिला बचतगट स्थापन करुन महिलांना सक्षमीकरण करत आहेत.
प्रगती महिला मंडळाच्या खजिनदार म्हणून पदभार सांभाळत या माध्यमातून प्रत्येक वर्षी मकरसंक्रांत दिनी महिलांचा हळदी -कुंकू कार्यक्रम घेणे, महिला दिन साजरा करणे, अशा सामाजिक क्षेत्रात ते नेहमी कार्यरत आहेत.याचेच औचित्य साधून त्यांना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार” लोकनियुक्त सरपंच वंदना पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी उपसरपंच जाफर तहसीलदार, ग्रामपंचायत सदस्य -आप्पासाहेब म्हैशाळे, शितल हळिंगळे, अनिल वळवाडे, सलमान बैरगदार, अमोल माने, रमेशकुमार मिठारे यांच्यासह ग्रामपंचायत सेवक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. सदरचा पुरस्कार सोहळा ग्रामपंचायत कार्यालय अकिवाट येथे संपन्न झाला. पुरस्कार मिळाले बद्दल परिसरातून भाग्यश्री मिठारे यांचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
