शिरोळ / महान कार्य वृत्तसेवा
मौजे आगर (ता.शिरोळ) येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलाच्या शासकीय निवासी शाळेमध्ये इयत्ता ६ वी ते १० वी या वर्गामध्ये मोफत प्रवेश देणे सुरू आहे. सर्व सोयीनियुक्त सुसज्ज डिजिटल शाळा असून प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत टॅब देण्यात येणार आहे. तरी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याध्यापक प्रदीप जवाहिरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
शाळेमध्ये मोफत निवास व भोजनाची सोय आहे. तसेच शैक्षणिक साहित्यासह अन्य सुविधादेखील मोफत आहेत. शाळेची इमारत स्वछ व सुसज्ज वातावरणात असून स्वतंत्र प्रयोगशाळा व ग्रंथालय सुविधा तसेच क्रीडांगण उपलब्ध आहे. विविध खेळ व स्पर्धा परिक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले जाते.
या शाळेत ८० टक्के प्रवेश अनुसूचित जातीसाठी व २० टक्के प्रवेश इतर प्रवर्गातील विध्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र या कागदपत्रांची आवश्यकता असून प्रवेशासाठी त्वरित मुख्याध्यापक प्रदीप जवाहिरे (मो.नं. ८२७५४४८८८७) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
