इचलकरंजी : महान कार्य वृत्तसेवा
एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल इचलकरंजी येथील सेवाभारती संचलित माधव विद्या मंदिरास आदर्श संस्था पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथे झालेल्या शिक्षक मेळाव्यात या पुरस्काराचे वितरण राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते तसेच खास. धैर्यशील माने, खास.धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
कष्टक-यांच्या नगरीत यंञमाग व इतर उद्योगातील कामगारांच्या मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी सुरु करण्यात आलेल्या माधव विद्या मंदिरने शिक्षणाबरोबरच इतर उपक्रम सुरु ठेवले आहे.यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने माधव विद्या मंदिरला आदर्श संस्था पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी माधव विद्या मंदिरचे मुख्याध्यापक किरण बन्ने यांनी हा पुरस्कार स्विकारला.यावेळी प्रसिद्ध व्याख्याते प्रा.गणेश शिंदे, प्रा.डाॅ.बापूसाहेब आडसूळ, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासह विविध मान्यवर तसेच माधव विद्या मंदिरच्या उपमुख्याध्यापिका सौ.सुजाता साळवी, पर्यवेक्षिका कु.संगिता पोवार, बालवाडी विभाग प्रमुख सौ.अस्मिता ठिकणे , राजाराम बरागडे यांच्यासह एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
