Spread the love

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

 येथील डीकेटीई  संस्थेच्या प्रभावी इंटर्नशिप योजनेअंतर्गत इंजिनिअरींगमधील १६० हून अधिक विद्यार्थ्यांना हेक्सावेअर, डॅनफोस, सायन एनर्जी, व्ही डिझाईन, फेव्हिनो, कॉटमॅक यासह दिग्गज आयटी व इंजिनिअरींग क्षेत्रातील देशविदेशातील नामांकित कंपन्याकडून थेट प्री-प्लेसमेंट ऑफर्स (पीपीओ) प्राप्त झाल्या आहेत.

विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे,सचिव डॉ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांस डायरेक्टर डॉ. एल. एस. अडमुठे, डे.डायरेक्टर डॉ. यु.जे.पाटील, सर्व विभागप्रमुख, टीपीओ प्रा.जी.एस.जोशी, व टीपीओ कोऑर्डिनेटर यांचे मार्गदर्शन लाभले.