हेरले / महान कार्य वृत्तसेवा
महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हेरले (ता.हातकणंगले) येथील सुजाता कचरे व वहीदा खतीब या दोन महिलांना ग्रामपंचायतीच्यावतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आसल्याची माहिती निवड समितीचे अध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे यांनी दिली.
महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाने व ग्रामपंचायत हेरले यांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता महिला बचतगट, आरोग्य, साक्षरता, आरोग्य स्वयंमसेविका (आशा) यासारख्या कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य करून महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. या कामाची दखल घेऊन त्यांना सरपंच राहुल शेटे व उपसरपंच निलोफर खतीब, सदस्य उर्मिला कुरणे यांच्या हस्ते सन्मानपत्र , शाल, श्रीफळ , सन्मानचिन्ह, देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी सरपंच राहुल शेटे, उपसरपंच निलोफर खतीब, ग्रामपंचायत अधिकारी बी एस.कांबळे, ग्रामपंचायत सदस्य विजय भोसले, मनोज पाटील, अमित पाटील, मानसिंग माने, उर्मिला कुरणे, जयश्री कुरणे आदी उपस्थित होते.
