पट्टणकोडोली / महान कार्य वृत्तसेवा
श्री विठ्ठल बिरदेव मंदिर, पट्टणकोडोली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे अनावरण व पूजन सोहळा अत्यंत भक्तिपूर्वक पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन व पूजन माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि भाजपा कोल्हापूर ग्रामीण (पूर्व विभाग) चे जिल्हाध्यक्ष श्री. राजवर्धन नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, सतीश पंडित, हुपरी मंडल अध्यक्ष सुभाष गोटखिडे, प्रकाश काका पाटील, धनंजय मगदूम, गोगा बानदार, सुरज बेडगे, प्रकाश जाधव, बाळासो रणदिवे, योगेश कळंत्रे, सुभाष भारती, किरण कांबळे, सुदर्शन खाडे, सागर कोरे, राजू नाईक, अभय काश्मिरे, रावसाहेब पाटील, सनद भोजकर, धुळा डावरे, रानोजी पुजारी, रागुल लाली, सतीश पुजारी, रायगोड डावरे, सरताज नाईकवडी, इंद्रजीत विभुते, राजु चिटणीस यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
