Spread the love

पुणे / महान कार्य वृत्तसेवा

वैष्णवी हगवणे हुंडा बळी प्रकरणी आरोपी निलेश चव्हाण ला अटक केल्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होत .. निलेश चव्हाणवर असलेल्या आरोपांवर युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चव्हाणवर वैष्णवीच्या कुटुंबीयांना धमकावणे, तिच्या मुलाला बळजबरीने ठेवणे, आणि शस्त्र दाखवून धमकी देणे यांसह अनेक गंभीर आरोप होते. मात्र सुनावणीदरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहे. वैष्णवीला मारहाण करताना निलेशकडे असलेल्या शस्त्राचा वापर करण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

निलेश चव्हाणला बावधन पोलीसांनी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात न्यायाधीशांसमोर हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयात झालेल्या युक्तीवादानंतर निलेश चव्हाणला तीन जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. निलेश चव्हाणवर पोलिसांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. निलेशकडे एक शस्त्र परवाना आणि एक शस्त्र आहे. त्याचा वापर करून वैष्णवीचा छळ केल्याची शक्यता आहेत. निलेशकडे असलेल्या शस्त्राचा धाक दाखवत वैष्णवीला धमकावल्याची शक्यता आहे, पोलिसांना याचा तपास करायचा आहे.

निलेश चव्हाण नेमका पळून गेल्यानंतर कुठे होता?

शशांक,  सुशील आणि राजेंद्र हगवणे यांच्यासोबत निलेश चव्हाणचे मोठे आर्थिक संबंध आहे. लता आणि करिश्मा हगवणेचा मोबाईल निलेश चव्हाणकडे होते. या मोबाईलमध्ये वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी महत्वाचे पुरावे आहेत. तसेत पोलिसांना निलेश चव्हाण नेमका पळून गेल्यानंतर कुठे होता? त्याला मदत कोणी केली? कुठल्या मार्गाने तो तिथेपर्यंत पोहोचला याचा तपास करायचा आहे.

निलेशच्या मोबाईलचे सीडीआर तपासायचा: सरकारी वकील मुलाचे पालकत्व नसताना आणि अधिकृतपणे बाळाला कुठल्या कारणासाठी ताब्यात ठेवलं याचा तपास त्याच्याकडून करायचा आहे. या आधी देखील एका गुन्ह्यात तो फरार होता आणि या देखील गुन्ह्यात फरार आहे . तसेच आरोपीचे मोबाईलचे सीडीआर मिळवायचे आहेत, असेही वकील म्हणाले.