Spread the love

पुणे / महान कार्य वृत्तसेवा

वैष्णवी हगवणे यांच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला शुक्रवारी नेपाळमध्ये अटक झाली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर पुण्यात आणले. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेश तीन राज्यातून प्रवास करत नेपाळमध्ये पोहचला होता. पोलिसांनी त्याला नेपाळच्या सीमेवर बेड्या ठोकल्या.

त्यानंतर विमानाने त्याला पुण्यात आणले. निलेश चव्हाणला सकाळी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यावेळी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मृत्यूपूर्वी हगवणे कुटुंब आणि आरोपी निलेश चव्हाणमध्ये फोनवर संभाषण झाल्याचे समोर आले आहे. एवढच नाही तर निलेशकडे इतर दोन आरोपींचे मोबाईल सापडले आहे.

निलेश चव्हाण याला पुण्यात आणल्यानंतर पहाटेच थेरगाव रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आज न्यायालयात तीन जूनपर्यंत  पोलिस कोठडी दिली आहे. सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना म्हणाले की, निलेशनं करिश्माला फूस लावून छळायला लावले. वैष्णवीचा छळ कसा झाला हे तपासायचे आहे.

काय म्हणाले सरकारी वकील?

निलेश चव्हाण वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर तो हगवणे कुटुंबियांच्या संपर्कात होता. लता आणि करिश्मा यांचे फोन देखील निलेशकडे होते. कोणत्या नात्याने वैष्णवीचे बाळ कोणत्या नात्याने ठेवले अशा अनेक प्रश्नांची चौकशी करायची आहे. साक्षीदराराच्या साक्षीनुसार करिश्मासोबत ही कॉनस्पिरसी केल्याचे समोर आले आहे.

निलेशचे वकील काय म्हणाले?

हगवणे कुंटुंबाल मदत केल्याने निलेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदवल्यापासून त्याने पोलिसांना सहकार्य केले आहे. निलेशला आधी किरकोळ आणि नंतर मुख्य गुन्ह्यात आरोपी केले.