Spread the love

डोबिंवली / महान कार्य वृत्तसेवा

तील पलावा पुलाचे सात वर्षापासून चालू असलेलं काम पूर्ण न झाल्याने ठाकरे गटाने आज आंदोलन केलं. याच पुलाच्या पार्श्‌‍वभूमीवर मनसे देखील बॅनर लावले होते, तर ठाकरेच्या आंदोलनासोबत मनसे देखील सामिल होणार असल्याची चर्चा होती. अशातच मनसे सर्व पदाधिकारी पावलाच्या कार्यलयात हजर झाले आहेत, तर ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील पलावा पूलाखाली जमले. त्यानंतर दोघांनी एकत्र मिळून आंदोलन केलं. त्यावेळी मनसेचे माजी आमदार राजू पाटील देखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं.

राजू पाटील काय म्हणाले?

आजचं आंदोलन हे राजकीय मलोमिलनासाठी नसून डोंबिवलीकरांच्या अडचणीसाठी आहे. ठाकरे बंधूंचं माहीत नाही तर इथं आग्री बंधू एकत्र आले आहेत. डोंबिवली जी मनमानी सुरू आहे, त्याला आळा बसला पाहिजे, असं मत राजू पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं. गेल्या सात वर्षांपासून डोंबिवलीच्या लोकांना या गोष्टीचा त्रास होत आहे. वाहतूक कोंडी हा मोठा विषय जनतेसमोर आहे, यावर आवाज उठवला पाहिजे आणि मनमानी कारभार थांबवला पाहिजे, असं राजू पाटील म्हणाले आहेत.

कल्याण-शिळ मार्गावर होणारी वाहतूक कोंडी वाहनचालक, नागरिक आणि विशेषत: शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आता एक मोठी डोकेदुखी बनली आहे. अनेकदा तर वाहतूक कोंडीमुळे शाळा बंद ठेवण्याचीही वेळ येते, इतकी भीषण परिस्थिती या रस्त्यावर निर्माण झाली आहे. या रस्त्यावर सध्या एकाच वेळी अनेक कामे सुरू आहेत. एकीकडे मेट्रोचे काम, दुसऱ्या बाजूला काही प्रमाणात रस्त्याचे काम आणि पलावा पुलाचे काम देखील सुरू आहे. या सुरू असलेल्या कामांमुळे आणि बेशिस्त वाहनचालकांच्या बेपर्वा वर्तनामुळे कल्याण-शिळ रस्त्यावर अक्षरश: वाहतुकीचा बोजवारा उडतो. वाहनचालकांना दीड-दीड तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते, ज्यामुळे नवी मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.

वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, पण कधीकधी या रस्त्यावर वाहतूक कोंडी इतकी वाढते की, या रस्त्याने प्रवासच करू नये असा विचार मनात येतो. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पलावा जंक्शन येथे दोन पुलांचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, हे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याचे समोर आले आहे आणि ते अजूनही अपूर्ण आहे.