धाराशिव / महान कार्य वृत्तसेवा
धाराशिव शहरात भरधाव गाडीतून अर्धनग्न अवस्थेत टवाळखोरी करणाऱ्या तरुणांचा संतापजनक व्हिडिओ समोर आलाय. शहराच्या मध्यवर्ती रस्त्यावर काही तरुणांनी गाडीतून डोकी बाहेर काढत अील हावभाव करत अंगप्रदर्शन केलंय. हा प्रकार भानुनगर ते सेंट्रल बिल्डिंग या मुख्य मार्गावर घडल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे जिथं ही टवाळखोरी झाली तो रस्ता थेट पोलिस स्थानकाच्या समोरून जातो. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे आणि या प्रकारावर कारवाईची मागणी जोर धरतेय. सध्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावरही वेगाने व्हायरल होतोय.
गाडीच्या खिडकीतून बाहेर येत केले अंगप्रदर्शन
धाराशिव शहरात भरधाव कारमध्ये अर्धनग्न तरुणांच्या हुल्लडबाजीचा संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. शहराचा मुख्य मार्ग असलेल्या भानुनगर ते सेंट्रल बिल्डिंग रस्त्यावर चालत्या गाडीत हुल्लडबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काही तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करत अशोभनीय वर्तन केले. या तरुणांनी रस्त्यावर विचित्र हावभाव करत कपडे काढून अंगप्रदर्शन केले. विशेष म्हणजे ज्या रस्त्यावर या तरुणांनी टवाळखोरी केली तो रस्ता पोलीस स्थानकाच्या समोरून जातोय. या प्रकारामुळे सार्वजनिक शिस्तीचा आणि नैतिकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावरही व्हायरल होत आहे.
पोलिसांचा वचक कमी झाला?
या सगळ्या प्रकारात जास्त धक्कादायक गोष्ट म्हणजे जिथं ही टवाळखोरी झाली, तो रस्ता थेट पोलिस स्थानकासमोरून जातो. त्यामुळे पोलिसांची कार्यपद्धती, गस्त, आणि जबाबदारीवर नागरिक प्रश्न विचारतायत. धाराशिव शहरातील भानुनगर ते सेंट्रल बिल्डिंग दरम्यान काही तरुणांनी भरधाव चारचाकीमध्ये डोके बाहेर काढत टवाळखोरी केली. गाडीच्या खिडकीतून बाहेर येत त्यांनी अंगप्रदर्शन करत अशोभनीय हावभाव केले. तरुणांचा हा हुल्लडबाजपणा अगदी पोलिस स्थानकासमोरून जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
