पोलिसांवर हप्तेबाजीचा आरोप, धक्कादायक माहिती समोर!
छत्रपती संभाजीनगर / महान कार्य वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठ्या दरोड्याच्या प्रकरणाला नवं वळण लागलं असून पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरोड्यातील आरोपी पैकी एक आरोपी पोलिसांना हप्ते देत असल्याचे समोर आले आहे. या हप्त्यांची यादी 2023 मध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जाहीर केली होती. संभाजीनगर पोलीस प्रति महिन्याला अवैध धंद्यातून साठ लाख रुपये हप्ता घेत असल्याची एक यादी जाहीर केली होती. त्यामध्ये देशी दारू विकण्यासाठी यातील आरोपी योगेश हसबे हा प्रती महिना 20 हजार रुपयांचा हप्ता देत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता.
संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी डल्ला मारण्यापूर्वीच हसबेला टीप
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील उद्योजक संतोष लड्डा (एरहूदेप् थ्र््र) यांच्या निवासस्थानी पडलेल्या सर्वात मोठ्या दरोडा प्रकरणानंतर हाच मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून आता पोलिसांच्या भूमिकेवरी ही संशय व्यक्त केला जात आहे. तर संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी साडेपाच किलो सोन्यावर डल्ला मारणारा योगेश हसबे याला घरात मोठं घबाड असल्याची या पूर्वीच टीप मिळाली असल्याचे ही समोर आले आहे.
कोण आहेत योगेश हसबे?
योगेश हसबेचं (वय 31 वर्ष) मूळ गाव बुलढाणा असून तो हल्ली सालमपुरे रोड, वडगाव मुक्कामी आहे. तो 2012 पासून दारू विक्रेता असून नंतरत्याने वडगाव कोल्हाटीमध्ये हॉटेल काढलं. त्यात वेश्या व्यवसाय चालवत असल्याचा आरोप आहे. विधान परिषद विरोध पक्षनेते दानवे यांनी योगेश दारूसाठी 20 हजार पोलिसांना हप्ता देत होता असा आरोप केला आहे. हसबेचे वडिल वडगाव कोल्हाटी येथे टपरी चालवत असून त्यात त्याने दारूचा व्यवसाय सुरू केला. वडिलांनंतर योगेश हसबेने दारू विक्री सुरू ठेवली आणि गावात दारू विक्रेते गट तयार झाले. यातून हसबेने पोलिसांना हफ्ता दिल्याचे बोललं जात आहे. हसबे पोलिसांजवळ गेला आणि त्यानंतर त्याने परिसरातील वेश्या व्यवसायाला कंडोम विक्री केली. नंतर स्वत: साई गार्डन हॉटेल सुरू केलं आणि त्यात वेश्या वावसाय सुरू केला. या मध्ये पोलिसांच्या हफत्याचे कलेक्शन असल्याचा आरोप केला जात आहे.
