Spread the love

मुंबईतील चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मुंबईतील चेंबूरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीनं शारिरीक संबध ठेवण्यास नकार दिल्यानं पतीनं पत्नीला जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत पीडित महिला 70 टक्क्यांहून अधिक भाजली असून तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. चेंबूरमधील वाशी नाका परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पतीवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पीडित महिला (वय 38) ही सकाळी आपल्या कामावर जाण्याच्या तयारीत असताना, तिच्या पतीने शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह केला. मात्र कामावर उशीर होऊ नये म्हणून तिने नकार दिला. एवढ्या कारणावरून पती रागाच्या भरात पत्नीला पेटवून दिलं. पत्नी आगीत गंभीररीत्या भाजली आहे.

नेमकं घडलं काय? ही घटना 30 मे रोजी रात्री चेंबूरच्या वाशी नाका भागात घडली. पीडित महिला (वय 38) सकाळी आपल्या कामावर जायच्या तयारीत होती. तेव्हा तिच्या पतीने शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह धरला. मात्र, कामावर उशीर होणार असल्यामुळे पत्नीने नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या पतीने घरात असलेल्या केरोसिनचा उपयोग करून पत्नीवर ओतलं आणि तिला पेटवून दिलं. घटनेनंतर परिसरातील लोकांनी धाव घेत तिला तत्काळ सायन रुग्णालयात दाखल केलं. ती सध्या 70 टक्क्यांहून अधिक भाजली आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी पतीविरोधात हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचार आदी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.  या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. वैवाहिक नात्यातील हिंसाचाराचे हे अत्यंत गंभीर आणि अमानवी रूप समोर आले आहे.