Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे. हिंदी ही आमची लाडकी बहीण असल्याचं वक्तव्य राज्य परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी केलंय. राज्यात काही दिवसांपूर्वी मराठी भाषेच्या वापराबाबत राजकीय वातावरण तापलेलं होतं. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ”हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे. हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे,” असं वक्तव्य केलं आहे. सरनाईकांच्या या विधानाची सध्या मोठी चर्चा आहे.

काय म्हणाले प्रताप सरनाईक?

हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे. हिंदी ही आमची लाडकी बहीण असल्याचं वक्तव्य राज्य परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी केलंय. गेल्या काही दिवसांपूर्वी मराठी भाषेच्या वापरावरून राजकीय वातावरण तापलं होतं. हिंदी तर आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे. आम्ही मराठीला मातृभाषा म्हणतो पण आमच्या तोंडी कधी हिंदी येते, कधी इंग्रजी येते. त्यामुळं हिंदीला आता बोलीभाषा बनली आहे. ठाणे व मिरा भाईंदर हा माझा मतदारसंघ आहे. जनतेशी बोलताना शुदध मराठीत बोलतो. जेंव्हा मिरा भाईंदरकडे जातो तेंव्हा आपोआप तोंडातून हिंदी बाहेर पडते. आजकाल आपण मराठी आमची मातृभाषा आहे, आमची माय आहे असं म्हणतो. पण हिंदी आपली लाडकी बहीण आहे. कारण लाडक्या बहिणींमुळं आम्ही आज 237 च्याही पुढे गेलो आहोत. असं परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.

मिरा भाईंदरमध्ये शिवसेना भाजपमध्ये वाद? मिरा-भाईंदरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू असल्याचं बोललं जात आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वत:च्या फायद्यासाठी सरकारी निधीचा वापर केला असल्याने, महायुती सरकारची बदनामी होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. शिवसेनेकडून शहरात अनेकठिकाणी बेकायदा कंटेनर शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर भाजपने कारवाईची मागणी केल्याने वादाला सुरुवात झाली आहे. प्रताप सरनाईक यांनी स्वत:च्या फायद्यासाठी सरकारी निधीचा वापर केला असल्याने, महायुती सरकारची बदनामी होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हे आरोप सरनाईकांनी फेटाळले होते.