मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
वैष्णवी हगवणे हिच्या बाळाची हेळसांड करणारा आरोपी निलेश चव्हाण याला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सूनावण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसांपासून निलेश चव्हाण पोलिसांना गुंगारा देत होता. त्यानंतर काल नेपाळ बॉर्डरवर पोलिसांनी निलेश चव्हाणला बेड्या ठोकल्या. आज निलेश चव्हाणला शिवाजी नगर कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टात सरकारी वकील आणि निलेश चव्हाण यांच्या वकिलांमध्ये युक्तिवाद झाला.
कोर्टात नेमकं काय काय घडलं?
सरकारी वकिलांचा युक्तीवाद-
– निलेश चव्हाणकडे असलेले लता आणि करिष्मा यांचे मोबाईल जप्त करायचे आहेत.
– वैष्णवीच्या छळवणुकीचा छळ करण्याचा कट कसा रचण्यात आला याची चौकशी करायची आहे.
– वैष्णवीचे बाळ निलेश चव्हाणणे स्वत:कडे कोणत्या अधिकारात ठेवले याची चौकशी करायची आहे.
– निलेश चव्हाणवर दाखल गुन्ह्यात कलमांची वाढ करण्यात आलीय.
– निलेश नातेवाईक नसताना देखील निलेशने वैष्णवीचे बाळ स्वत:कडे ठेवले .
– निलेश चव्हाणणे करिष्माला फुस लाऊन वैष्णवीचा छळ करायला लावला.
– निलेशकडे असलेले पिस्तुल जप्त करायचे आहे.
– निलेशच्या मोबाइलमधील डेटा जप्त करायचा आहे.

– निलेशच्या मोबाईलमधील डेटा जप्त करायचा आहे.
निलेश चव्हाणचे वकील-
– निलेशवर आधी किरकोळ गुन्हा होता. त्यानंतर त्याला मुख्य गुन्ह्यात आरोपी करण्यात आलंय.
– निलेश चव्हाण हगवणे कुटुंबाला मदत करत होता. म्हणून त्याला आरोपी करण्यात आलंय.
– निलेश चव्हाणने त्याचावर दाखल गुन्ह्यात नेहमीच पोलीसांना सहकार्य केलंय.
सरकारी वकील-
वैष्णवीच्या आत्महत्येनंतर निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबातील इतर आरोपी यांच्यात मोबाइलवरुन संभाषण झाले आहे . त्या संभाषणाची माहिती पोलीसांना घ्यायची आहे. निलेशची वैष्णवीच्या आत्महत्येत काही भुमिका आहे का याचा तपास करायचा आहे.
निलेश चव्हाणने पोलिसांना असा गुंगारा दिला?
– पैशांची देवाण-घेवाण करताना ऑनलाईन ट्रान्झिक्शन केलं तर पोलिसांना लोकेशन कळेल म्हणून पुणे सोडताना त्याने लाखो रुपयांची रोकड सोबत बाळगली.
– सोबत 4 ते 5 मोबाईल आणि सिम कार्ड बाळगले. काही मोबाईल आणि सिम कार्ड मित्रांकडून घेतले.
– नेपाळमध्ये ही स्वतंत्र सिम कार्ड खरेदी केले.
– प्रत्येकवेळी वेगवेगळ्या मोबाईलमध्ये वेगवेगळे सिमकार्ड घालून वापर करायचा.
– संपर्क साधण्यासाठी ऑनलाईन कॉलिंगचा आधार घेतला.
– ऑनलाईन कॉलिंगवरुन अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी काही वकिलांशी संवाद साधत होता.
– अनेकदा फोन बंद पडल्याचे बहाणे करत, त्या-त्या ठिकाणच्या व्यक्तींच्या फोनचा आणि वाय-फायचा वापर केला.
– सीसीटीव्हीच्या साह्याने पोलीस आपल्यापर्यंत पोहचतील, म्हणून स्वत:च्या ऐवजी खाजगी वाहनाने प्रवास केला.