Spread the love

कोर्टात वकिलांनी सगळंच सांगितले, ‌’नातेवाईक नसताना…‌’

पुणे / महान कार्य वृत्तसेवा

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबीयांचा निकटवर्तीय असून त्याचा कुटुंबीयांवर खूप प्रभाव होता, असं संशय पोलिसांना आहे. त्याने वैष्णवीच्या बाळाला संभाळायची जबाबदारी कशी दिली? याचा तपास पोलिसांना करायचा आहे. त्यामुळं पोलिसांनी कोर्टाकडे पोलीस कोठडीची मागणी केली होती. कोर्टाने ही मागणी मान्य करत 3 जूनपर्यंत निलेश चव्हाण याला पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश विक्रांत खंदारे यांनी हा निर्णय सुनावला आहे.

आरोपी निलेश चव्हाण याला नेपाळ बोर्डरवरुन अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज सुट्टीकालीन न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं आहे. या वेळी कोर्टात सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी आरोपीचा मोबाईल जप्त करायचा आहे. तसंच, वैष्णवीच्या बाळाला काय कारणाने जवळ ठेवले. याचीही चौकशी करायची आहे, असं न्यायालयात स्पष्ट केलं होतं. सरकारी वकिलांच्या या युक्तीवादावर निलेश चव्हाण याच्या वकिलांनी आशिलाचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळं पोलिस कोठडी मिळू नये. फक्त मोबाइल जप्त करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. पिस्तुल परवाना त्यांच्याकडे आहे त्याचा कुठेही गैरवापर झालेला नाही, असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला आहे.

 आरोपीच्या वकिलांचा आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद

>> सरकारी वकील: आरोपी हा या दोन्ही कुटुंबाचा नातेवाईक नसतानाही त्याच्याकडे बाळ कसं ठेवलं? याची चौकशी करायची आहे. काल आरोपीला नेपाळ बॉर्डरवरून अटक केली आहे. मयत आणि हगवणे कुटुंबाशी त्याचे या काळात नेमके काय संभाषण झाले त्याचा गुन्ह्यात काही रोल आहे का याची चौकशी करायची आहे. आरोपीला अधिकच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलानी केली आहे.

आरोपीचे वकील: गुन्हा घडण्याआधी माझ्या अशिलाचा यात काहीच रोल नव्हता. फक्त बाळापुरता संबंध आलेला तोही सांभाळायला दिलं म्हणून.बाकी काही संबध नाही.

आरोपीचे वकील:  या प्रकरणात निलेशचा रोल काय आहे हे अद्याप सिद्ध झाले नाही आरोपिच्या वकिलांकडून युक्तिवाद. त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करणे चुकीचे आहे. त्यांच्याकडे असणारे पिस्तूलचा कुठेही वापर झाला नाही

सरकारी वकील: निलेश चव्हाण हा हगवणे किंवा कस्पटे कुटुंबीयांचा नातेवाईक नसताना त्याच्याकडे बाळ कसे काय याचा तपास करायचा आहे. वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्यापूर्वी निलेश चव्हाण यांचा संवाद झाला आहे, याचा तपास करायचा आहे.

सरकारी वकील: मोबाईल डाटा डिलीट केला असेल ते त्याचा तपास करायचा आहे. त्याच्याकडे असणाऱ्या शस्त्राचा तपास करायचा आहे. त्याचा उद्देश काय होता याचा तपास करायचा आहे.

आरोपीचे वकील: निलेश चव्हाणचा या प्रकरणाशी काही संबंध नाहीये. अटक करायची आणि पुरावे रचले जात आहेत.