Oplus_131072
Spread the love

सौर योजना प्रकल्पाविरोधात शिंपे ग्रामस्थांनी शाहुवाडी तहसिलदार कार्यालायावर काढला मोर्चा

शाहुवाडी / महान कार्य वृत्तसेवा

पर्यावरणाचा -हास करून जनतेवर लादण्यात आलेला मुख्यमंत्री सौर योजना प्रकल्पाचे काम चार दिवसात बंद झाले नाही तर शिंपे ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरा ढोरा – पोरा बाळासह बि-हाड घेऊन मौर्चा काढणार असल्याचे प्रतिपादन शेतकरी जनआंदोलनांचे प्रमुख आबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. शाहूवाडी तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात बोलत होते.

शिंपे (ता.शाहुवाडी) येथील  गावात शासनाने मुख्यमंत्री सौर प्रकल्प ३० एकरावरील गायरान जमिनीवर राबविण्याचे काम सुरु केले आहे. ग्रामस्थांना विश्वासात न घेता ठेकेदाराने ग्रामस्थांनी ३० वर्षापूर्वी लावलेली झाडे तोडली आहेत.या प्रकल्पाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. शासन व ग्रामपंचायतीचा निषेध करण्यासाठी शिंपे ग्रामस्थांनी शाहूवाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात ठेकेदार, ग्रामसेवक ,तलाठी यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

या प्रसंगी बोलतांना जेष्ठ नागरीक गोविंद पाटील म्हणाले आमचा जीव गेला तरी चालेल हा प्रकल्प आम्ही होवू देणार नाहीं. महसुल विभागाचे तलाठी ,ग्रामसेविका व गावकामगार पोलीस पाटील यांच्या संशयास्पद भूमिका असून यांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी सामजिक कार्यकर्ते ए डी पाटील यांनी केली.

यावेळी सागर पाटील ,ग्राम पंचायत सदस्य उदय पाटील ,सदाशिव पाटील यांची भाषणे झाली. आपल्या मागण्याचे निवेदन शाहुवाडीचे प्रभारी तहसिलदार गणेश लव्हे यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले.

या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध आहे. याचे सविस्तर वृतांत प्रांताधिकारी व आम्ही चर्चा करून जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठविणारा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सागर पाटील, भिमराव सुर्यवंशी, माणिक पाटील, दिपक पाटील, योगेश पाटील, उत्तम पाटील, मच्छिंद्र पाटील आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते

वन विभागाच्या परवाना सातशे झाडांचा आणि तोडली चौदाशे झाडे 

शिंपे (ता.शाहूवाडी) येथील ग्रामस्थांनी तीस वर्षापूर्वी  गायरान जमिनी वरती लावलेल्या झांडापैकी  ठेकेदाराने  सातशे झाडे तोडणे ऐवजी चौदाशे झाडे तोडून वन विभागाचा परवाना नसताना बेकायदेशीर तोड केल्याचा आरोप गावकरी –  सामाजिक कार्यकर्ते ए. डी . पाटील यांनी केला.