इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
डीकेटीई इन्स्टिटयूटमधील २८ विद्यार्थ्यांनी ‘गेट २०२५’ या परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश मिळवले. टेक्स्टाईल विभागातील ११, इएनटीसी विभागातील १, सिव्हिल इंजिनिअरींगमधील २, इलेक्ट्रीकल विभागातील १, कॉम्प्युटर सायन्स मधील ९ व एआयएमएल विभागातील ४ असे एकूण २८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ एल.एस.अडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील, सर्व विभागप्रमुख, कोऑर्डिनेटर, व करिअर गायडन्सचे शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
