Spread the love

‘त्या’ महिलेबाबत कोणता निर्णय झाला?

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर एका महिलेसोबत संभोग करताना भाजप नेता कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. भाजप नेते मनोहर लाल धाकड यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते महामार्गावर एका महिलेसोबत संभोग करत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये मनोहर लाल धाकड महामार्गावर त्याच महिलेसोबत नाचताना दिसत होते. हायवेवर अील कृत्य केल्याबद्दल पोलिसांनी भाजप नेते मनोहर लाल धाकड यांना आता अटक केली आहे.

मनोहर लाल धाकड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

13 मे च्या रात्री भाजप नेते मनोहर लाल धाकड यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी 23 मे रोजी मंदसौरच्या भानपुरा पोलिस ठाण्यात मनोहर लाल धाकड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसडीओपी दिनेश प्रजापती आणि टीआय आरसी डांगी त्यांची चौकशी करत आहेत. व्हिडिओ सार्वजनिक करण्यामागील हेतू काय होता आणि त्यात आणखी कोणाचा सहभाग होता याचाही प्रशासन आता तपास करत आहे.

महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि 23 मे च्या रात्री मनोहर लाल धाकड यांच्या घरावर छापा टाकला. पोलिसांनी धाकड यांची कार जप्त केली होती. भानपुरा टीआय आर.सी. डांगी म्हणाले की, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. मनोहर यांच्या अटकेनंतरच महिलेची माहिती उघड होईल, महिलेला सुद्धा अटक केली जाईल.

काँग्रेसने गंगाजल फवारले

भाजप नेते मनोहर लाल धाकड यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर वाद आणखी तीव होत आहे. याबाबत काँग्रेस आक्रमक आहे. रविवारी काँग्रेस कार्यकर्ते गरोठ परिसरातील टोल प्लाझावर पोहोचले आणि गायत्री मंत्राचा जप केला आणि गंगाजलाने एक्सप्रेस वे शुद्ध करून निषेध केला. त्याच वेळी काँग्रेस नेते सज्जन सिंह वर्मा म्हणाले की, मी गडकरीजींचे आभार मानू इच्छितो की त्यांनी एक्सप्रेस वेवर इतके उच्च दर्जाचे कॅमेरे बसवले आहेत, ज्यामध्ये हे संपूर्ण कृत्य स्पष्टपणे कैद झाले आहे. कदाचित त्यांनाही त्यांनी बांधलेले रस्ते अशा प्रकारे वापरले जातील अशी अपेक्षा नव्हती.