Spread the love

समुद्राचं पाणी रस्त्यांवर येणार….शहरात ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी 25 मे रोजीच केरळातून मान्सूननं थेट तळ कोकण गाठला. इतिहासात पहिल्यांदाच मान्सून इतक्या लवकर राज्यात आल्यानं यंत्रणेसह नागरिकांचीही तारांबळ उडाली. मुळात अंदमान आणि निकोबार बेटावरच मान्सून अपेक्षेहून आधी पोहोचल्यानं तो केरळमध्येही वेळेआधी दाखल झाला आणि तळकोकणही या आगमनाला अपवाद ठरलं नाही.

दरम्यान, 26 मे रोजी मुंबईमध्ये पूर्वमोसमी पावसाच्या धर्तीवरल यलो आणि ऑरेंज अलर्ज जारी केलेला असतानाच, हवामान विभागानं नव्यानं एक इशारा जारी करत तळ कोकणातून मान्सून 24 तासांहून कमी वेळात अत्यंत वायुवेगानं मुंबईत धडकला असल्याचं वृत्त जारी केलं. 16 दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल झाला असून एक नवा विक्रम केला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या नैॠत्य मान्सूननं मुंबई, कर्नाटक, बंगळुरू, तामिळनाडूचा उर्वरित भाग, तेलंगणाचा काही भाग, आंध प्रदेश, बंगालचा उपसागर, मिझोरम, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयचा काही भाग व्यापला आहे.

नैॠत्य मान्सून यंदाच्या वर्षी 26 मे 2025 रोजी मुंबईत दाखल झाल्याचं सांगत हवामान खात्याने जारी केलेल्या यलो अलर्टला आणखी वरच्या स्तरावर नेत ऑरेंज अलर्टवर जारी केला. या इशाऱ्यानुसार मुंबई, ठाणे आणि रायगड आता ऑरेंज अलर्ट लागू होत या भागांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तडाखा बसणार असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला.

मुंबई मुख्य शहर आणि उपनगरांमध्ये हवामान आणखी खराब होण्याची शक्यत असून पुढील 48 तासांसाठी ही स्थिती कायम राहू शकण्याचा अंदाज आहे. यादरम्यान समुद्र खवळणार असून उंचच उंच लाटा उसळतील असाही इसारा देण्यात आला आहे. सोमवारी मुंबई शहरातील समुद्रात 4.77 मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळणार असल्यानं मासेमार आणि नागरिकांना समुद्रानजीक न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

कोणत्या अलर्टचा काय अर्थ?

येलो अलटर्:  हवामान खराब होण्याची शक्यता आहे, सावध राहावे, पण परिस्थिती तितकी गंभीर नाही. यामध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असते.

ऑरेंज अलटर्:  हवामान खूप खराब होऊ शकते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान  होऊ शकते. यामध्ये मुसळधार पाऊस, पूरासह इतर धोका उदभवण्याची शक्यता आहे.

यंदाच्या मान्सूनच्या हंगामात किती वेळा समुद्र खवळणार? यंदा पावसाळी दिवसांमध्ये राज्यासह मुंबई शहरातील समुद्र 18 दिवस खवळणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये मान्सूनच्या शहरातील पहिल्या हजेरीचा दिवस अर्थात 26 मे आणि इतरही काही दिवसांचा समावेश आहे.