पन्हाळा / महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हिल स्टेशन आहे. महाराष्ट्रात पाच ठिकाणी हिल स्टेशन कर प्रवासी कर गोळा केला जातो. पन्हाळगडावर 1965 पासून प्रवासी कर चालू आहे.2008 पासून पार्किंग कर गोळा केला जातो. ५ ऑक्टोंबर 25 रोजी, युनेस्कोचे सदस्य ह्वाजोंग ली (कोरिया) यांची पन्हाळगडावर भेट देण्यापूर्वी हे शेड काढण्यात आले होते. परंतु त्यानंतर शेड बांधण्यात आले नसल्यामुळे प्रवासी व कर्मचाऱ्यांची हाल होत आहेत.
पर्यटकांना व कर्मचाऱ्यांना ऊन वारा पावसाला कसलेही प्रकारचे आसरा राहिलेले नाही. त्यामुळे पर्यटकांचे पैसे देताना व नगरपरिषदेत कर्मचाऱ्यांचे कर वसुली करताना सुद्धा हाल होत आहेत .
गडावर पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात असल्याने छत्री रेनकोटचा अंगावर घालून सुद्धा उपयोग होताना दिसत नाही. भिजलेले कर्मचारी पर्यटकांना पास देत आहेत. यामध्ये पास व पैसेही भिजत आहेत.
तसेच पर्यटकांमधून पण नाराजीची सूर उमट आहे. एक तर पैसे द्या व ते भिजत द्या त्यामुळे पन्हाळगडावर आल्यावर सुरुवातीलाच पर्यटक नाराज होत असलेले दिसत आहेत. पन्हाळगडावर अत्याधुनिक 13 डी थेटर चे लोकपाल सोहळा नुकताच पार पडला तसेच पन्हाळा हे वर्ल्ड हेरिटेज मध्ये नामांकित होणार आहे. परंतु सुरुवातीलाच पर्यटकांना प्रवासी कर देतानाच कसरत करत लागत आहे.
