Spread the love

पाटणा / महान कार्य वृत्तसेवा

माजी केंद्रीय रेल्वेमंत्री तथा राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू यादव यांनी त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. त्यांनी तेज प्रताप यादव यांना पक्षासह कुटुंबातून काढून टाकलं आहे. या कारवाईमागे त्यांची सोशल मीडिया पोस्ट कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. कारण, लालू प्रसाद यादव यांनीदेखील तेज प्रताप यादव यांच्या वागणुकीबाबत सोशल मीडियातून प्रश्न उपस्थित केला.

6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी- बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी मुलागा तेज प्रताप यांना कुटुंबासह पक्षातून काढण्याचं निर्णय समर्थन करताना मुलाच्या वर्तणुकीवर भाष्य केलं आहे. लालूप्रसाद यादव यांनी म्हटलं, वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्यानं सामाजिक न्यायासाठीचा आपण करत असलेला संघर्ष कमकुवत होतो. मोठ्या मुलाची वागणूक, सार्वजनिक वागवणूक आणि बेजबाबदार वर्तन आमच्या कौटुंबिक मूल्ये आणि परंपरांनुसार नाही. अशा परिस्थितीत मी त्यांना पक्ष आणि कुटुंबातून काढून टाकत आहे. आतापासून, त्यांची पक्ष आणि कुटुंबात कोणतीही भूमिका राहणार नाही. त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे. ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील चांगले अथवा वाईट आणि गुण-दोष पाहण्याकरिता सक्षम आहेत.

इतरांनी आज्ञाधारकरपणं पालनं केलं- लालूप्रसाद यादव यांनी तेजप्रसाद यादव यांच्याशी संबंध ठेवण्याऱ्यांना अप्रत्यक्षपणं सावध केलं आहे. राजदचे अध्यक्ष म्हणाले, ज्यांचे तेज प्रताप यांच्याशी संबंध आहेत, त्यांनी स्वत:च्या विवेकबुद्धीनं निर्णय घ्यावा. मी नेहमीच सार्वजनिक जीवनात सार्वजनिक प्रतिष्ठेचं समर्थन करत राहिलो आहे. कुटुंबातील आज्ञाधारक सदस्यांनी सार्वजनिक जीवनात ही कल्पना स्वीकारली आहे. त्याप्रमाणं पालन केलं आहे.

तेज प्रताप यादव हे नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेत राहिले आहेत. शनिवारी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून अनुष्का यादव नावाच्या मुलीसोबतचा एक फोटो पोस्ट करण्यात आला. त्यानंतर रात्री त्यांनी अकाउंट हॅक झाल्याचं सांगत सारवासारव केली होती. एवढेच नव्हे तर पोस्ट केलेला फोटो एआयद्वारे निर्मित असल्याचाही त्यांनी दावा केला.

फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं होतं? – आम्ही दोघेही गेल्या 12 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. प्रेम करतो. 12 वर्षांपासून नातेसंबंधामध्ये आहोत. तेज प्रताप यादवच्या फेसबुक अकाउंटवर केलेल्या पोस्टनंतर त्यावर जितन राम मांझी यांनी लालू यादव यांच्या कुटुंबावर निशाणा साधला. तेज प्रताप कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होते? लालूंच्या कुटुंबाला मुलीचे आयुष्य उद्धवस्त करण्याचा अधिकार कोणी दिला? आगामी निवडणुकीत जनता याचा जाब विचारेल, असेही मांझी यांनी म्हटलं.

तेज प्रताप यादव आहेत विवाहित: राजद नेते तेज प्रताप यादव यांचं 12 मे 2018 रोजी पाटणा येथे बिहारचे माजी मंत्री चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या राय हिच्याशी मोठ्या थाटामाटात लग्न झाले. मात्र, लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यातच दोघांमध्ये वाद झाला. सध्या हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे. घटस्फोट झाला नसल्यानं तेज प्रताप विवाह करू शकत नाहीत. मात्र, त्यांनी एका मुलीशी नातेसंबंध असल्याचं दावा करणारी पोस्ट केल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारमधील राजकारण तापले आहे.