चांदापुरा / महान कार्य वृत्तसेवा
बंगळुरुच्या चांदापुरा भागातील एसबीआय शाखेत घडलेल्या एका प्रकाराची सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्याचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. या व्हिडीओत बँकेतील एका मॅनेजरनं एका ग्राहकाशी कन्नडमध्ये बोलण्यास नकार दिला आणि म्हटलं, ‘हा भारत आहे, मी कन्नड नाही तर हिंदी बोलेन’. तर यावरून सोशल मीडियावर मोठा वाद पेटला आणि त्यानंतर सगळीकडून त्यावर प्रतिक्रिया येऊ लागली. त्यात काही कन्नड राजकीय नेत्यांचा देखील समावेश आहे. त्यापैकी एक म्हणजे भाजपा नेता तेजस्वी सुर्या यांचं एक वक्तव्य. तेजस्वी सूर्या यांनी केलेल्या एका वक्तव्यावर आता लोकप्रिय गायक सोनू निगमनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
अमेरिकेचे क्लायंट्सना कन्नड भाषा बोलणं बंधन कारक !
खरंतर, तेजस्वी सूर्या यांनी म्हटलं की ‘जर तुम्ही कर्नाटकात ग्राहक सेवेचं काम करत असाल, विशेषत: बँकिंगसारख्या क्षेत्रात, तर ग्राहकांना त्यांच्या भाषेत संवाद साधणे महत्वाचे आहे.’ तेजस्वी सूर्या यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर उत्तर देत सोनू निगम म्हणाला, ‘सॉफ्टवेयर कंपण्यांमध्ये देखील कन्नड भाषा बोलणं बंधनकारक करायला हवं. जर अमेरिकेचे क्लायंट्स असतील तर कर्नाटकमध्ये त्यांचे प्रोजेक्ट्स करण्यासाठी त्यांना देखील कन्नड भाषेत बोलावं लागेल. यावर कोणत्याही प्रकारे तडजोड व्हायला नको. ठीक आहे. सूर्या जी.’
बिहारमधील निवडणूकीच्यावेळी तेजस्वी त्यांची भाषा बोलणार?
पुढे सोनू निगमनं आणखी एक ट्वीट करत म्हणाला, ‘बिहारमधील निवडणूकी दरम्यान, तेजस्वी जी भोजपुरी, मैथिली, मगही, बज्जिका, ठेठी किंवा अंगिका या भाषा बोलू शकणार आहेत? माननीय पंतप्रधान जी, एक भारत, श्रेष्ठ भारतावर वक्तव्य करतात आणि यांच्यासारखे लोकं भाषावाद आणि जागेवरून देशाला विभक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत.’
भाषिक, प्रादेशिक, जातीयवाद यासारखे वाईट विचार
पुढे सोनू निगमनं आणखी एक ट्वीट केलं या ट्वीटमध्ये तो म्हणाला की, ‘भाजपसारख्या राष्ट्रीय पार्टीनं दुसऱ्यांदा तेजस्वी सूर्या यांना खासदार बनवलं. पण त्यांच्यामुळे राष्ट्रवादाची भावना पुढे जाऊ शकणार नाही. भाषिक, प्रादेशिक, जातीयवाद यासारखे वाईट विचार करणारे लोक कुष्ठरोगासारखे असतात. तेजस्वी बिहारचा असो किंवा कर्नाटकचा, दोघेही सारखेच मूर्खपणा करत आहेत. तेजस्वी सूर्या कर्नाटकचा असो का तेजस्वी यादव आहे.’ पुढे सोनू निगम म्हणाला की ‘कन्नड चित्रपटांना हिंदीमध्ये डब करू नका. कन्नड चित्रपटांना पॅन इंडिया प्रदर्शित करू नका. तेजस्वी सूर्याजी कन्नड कलाकारांना हे सांगण्याची तुमच्यात हिंम्मत आहे का? किंवा तुम्ही आणखी एक भाषेवरुन भांडणारे योद्धे आहात?’
