Spread the love

सावर्डे / महान कार्य वृत्तसेवा

नरंदे ता हातकणंगले येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी नितीन जयसिंग कदम याची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी  लोकनियुक्त सरपंच पूजा कुरणे होत्या. गटांतर्गत ठरल्याप्रमाणे उपसरपंच संदिप भंडारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. निवडीसाठी गटनेते शरद साखर कारखाना संचालक अभिजित भंडारी, माजी सरपंच रविंद्र अनुसे, अमित भंडारी, उद्योजक सुनिल भोसले, राजेंद्र खोत यांचे सहकार्य लाभले.

यावेळी  विद्यानंद पाटील, ग्रामपंचायत सदस्या रुपाली अनुसे, रेखाताई पाटील, कविता भंडारी, संगिता खोत, मयुरी भोरे, ॲड.विदयारानी कदम, संगीता कदम, उद्योजक दादा शिखरे, अमोल पल्लखे आदी उपस्थित होते. आभार ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी मानले.