Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

भारतीय क्रिकेट संघ 20 जूनपासून इंग्लंड दौऱ्यावर 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्याआधी विराट कोहली आणि रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. यामुळे सगळ्यांचं प्रश्न पडला आहे की आता संघात अनुभवी कोण असणार आहे. दरम्यान मोहम्मद शमीही लवकरच निवृत्त होणार असल्याचा दावा केला. यामुळे भारतीय वेगवान  गोलंदाज शमी फारच संतापला आहे. आता त्याने आपला रक्त व्यक्त करत शमीने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्याने अशा लोकांवर भविष्य उद्ध्‌‍वस्त करण्याचा आरोपही केला.

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबाबत एका वेबसाइटने म्हटले आहे की, रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतर आता मोहम्मद शमी देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. शमीने सोशल मीडियावर हा दावा खोटा असल्याचे म्हणत आपला राग व्यक्त केला.

काय म्हणला शमी?

शमीने या खोट्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले, ”खूप छान महाराज, आता आपल्या नोकरीचे दिवस मोजा, किती वेळ राहिला आहे रिटायरमेंटला. आम्हाला नंतर बघा. तुमच्यासारख्यांनी भविष्याचा सत्यानाश करून टाकला. कधी तरी चांगले बोलायचे ठरवा. क्षमा करा, ही आजची सर्वात वाईट स्टोरी आहे.”

शमीला इंग्लंड दौऱ्यात मिळणार संधी?

सध्या शमी इंग्लंड दौऱ्यासाठी निवडला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात त्यांचे स्थान मिळण्याची शक्यता आहे. आयपीएल 2025 3 जून रोजी संपणार असून त्यानंतर बीसीसीआय इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा करणार आहे. 20 जूनपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टेस्ट मालिकेसाठी भारतीय संघ तयार करण्यात येणार आहे. रोहितच्या निवृत्तीनंतर नव्या कर्णधाराच्या शर्यतीत शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराह आघाडीवर आहेत.

शमीचे करियर

34 वर्षीय शमीने आतापर्यंत भारतासाठी 64 टेस्टमध्ये 229 विकेट घेतल्या आहेत. त्यांच्या नावावर 108 वनडे आणि 25 टी-20 सामन्यांत अनुक्रमे 206 आणि 27 विकेट्‌‍स आहेत.

भारताचा इंग्लंड दौरा 2025 वेळापत्रक

पहिली कसोटी: 20-24 जून – हेडिंग्ले, लीड्‌‍स

दुसरी कसोटी: 2-6 जुलै – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

तिसरी कसोटी: 10-14 जुलै – लॉर्ड्‌‍स, लंडन

चौथी कसोटी: 23-27 जुलै – एमिरेट्‌‍स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

पाचवी कसोटी: 31 जुलै-4 ऑगस्ट – द किआ ओव्हल, लंडन