चिठ्ठीत शिक्षणमंत्र्यांचा उल्लेख करत लिहलं
पुणे / महान कार्य वृत्तसेवा
पुण्यात एक धक्कादायक बातमी समोर आली होती. भोपाळमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने पुण्यात आपलं जीवन संपवलं. व्हॉटसॲप मेसेद्वारे आई-वडिलांना सुसाईट नोट पाठवली, स्वत:च्या व्हॉट्सॲप वर स्टेटस ठेऊन वैद्यकीय शिक्षण घेर्णाया विद्यार्थ्याने चाकूने भोसकून घेत आत्महत्या केली होती. उत्कर्ष हा मूळचा बीडमधील रहिवाशी होता. तो सध्या भोपाळमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. 12 मे ला पहाटेच्या सुमारास त्याने पुण्यातूनच आई-वडिलांना सुसाईड नोट पाठवून टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
या विद्यार्थ्याने अभ्यासाच्या तणावाला कंटाळून स्वत:चा गळा कापत पुण्यात आत्महत्या केली आहे. उत्कर्ष महादेव शिंगणे (वय 19 वर्षे) असे टोकाचं पाऊल उचलेल्या तरुणाचे नाव आहे. उत्कर्ष हा काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता, त्याचबरोबर तो उपचार सुद्धा घेत होता. पुण्यात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या क्रीडा महोत्सवाला आलेले असताना त्याने राहत्या खोलीत ऑनलाइन सुरी मागवून स्वत:चा गळा कापत आत्महत्या केली. उत्कर्षने आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉट्सॲप वर सुसाईड नोट लिहली होती, याप्रकरणी वानवडी पोलीस यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे.
मित्राला तिकीट बुक करायला लावलं अन्…
उत्कर्ष हा भोपाळमधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (अखखचड) मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. तो 8 मे रोजी पुण्यातील एएफएमसी मैदानावर आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी आला होता. सोमवारी पहाटे उत्कर्षने वसतिगृहाच्या बाथरूममध्ये स्वत:वर चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येच्या आदल्या रात्री उत्कर्षने महाविद्यालयाच्या फेस्टिव्हलमध्ये आपल्या मित्रांसोबत डीजे नाईटचा आनंद घेतला होता. इतकंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी भोपाळला परतण्यासाठी त्याने आपल्या मित्रांना तिकीट बुक करून द्यायला सांगितलं होतं. पण 12 मे रोजी पहाटे त्याने अचानक हे टोकाचं पाऊल उचललं.
ऑनलाइन चाकू ऑर्डर केला
शैक्षणिक ताण आणि नैराश्यामुळे एका 20 वर्षीय एमबीबीएस विद्यार्थ्याने स्वत:वर चाकूने वार करून आपलं आयुष्य संपवलं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बाथरूममध्ये उत्कर्ष रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला, अशी माहिती वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यजित आदमाने यांनी दिली. पोलिस तपासात समोर आले की उत्कर्षने आत्महत्येसाठी वापरलेला चाकू ऑनलाइन मागवला होता. त्याच चाकूने त्याने स्वत:वर वार करत टोकाचं पाऊल उचललं.
सुसाईड नोटमध्ये काय म्हटलंय?
मी उत्कर्ष शिंगणे, भोपाळमधील एम्सचा विद्यार्थी आहे. शैक्षणिक ताण आणि नैराश्यामुळे मी स्वत:चा जीवन संपवत आहे. मी शिक्षणमंर्त्यांना विनंती करतो की अभ्यासक्रमातून मुघल, फ्रेंच आणि रशियन इतिहास काढून टाकावा आणि त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे चरित्र समाविष्ट करावे, असं त्याने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
उत्कर्षला नीटमध्ये परीक्षेत 720 पैकी 710 मार्क
उत्कर्ष अभ्यासात देखील खूप हुशार होता. उत्कर्षला नीट परिक्षेमध्ये 720 पैकी 710 मार्क आले होते.
