इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
अल्पवयीन मुलीचे बाळंतपण करून तिचे अपत्याची पैशाचे आमिष दाखवून २ लाख रुपयांना परराज्यात विक्री केल्याच्या आरोपातून इचलकरंजीतील डॉ.अरुण भूपाल पाटील, त्यांची पत्नी सौ. उज्वला अरुण पाटील, मुलगा डॉ. ऋषिकेश अरुण पाटील यांच्यासह बालक खरेदीचा आरोप असलेले अनिल दशरथ चहांदे आणि सौ. प्रेरणा अनिल चहांदे यांची येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मिलिंद भोसले यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. प्रमुख संशयित डॉ. पाटील दाम्पत्य व डॉ.ऋषिकेश पाटील यांच्या वतीने अॅड. मेहबूब बाणदार यांनी युक्तिवाद केला.
संपूर्ण राज्यात गाजलेल्या या हाय प्रोफाईल खटल्यात कोणतेही दत्तकविधान न पार पाडता अल्पवयीन मुलीचे जन्मास आलेले नवजात बालक परराज्यातील व्यक्तींना विक‘ी केले, खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले, नवजात बालकाची नोंद शासकीय प्राधीकरणात केली नाही, ठेव पावत्या ठेवल्या असे विविध स्वरूपाचे आरोप संशयीतावर होते.
या खटल्याची सुनावणी येथील सत्र न्यायालयात झाली. सरकार पक्ष तर्फे तब्बल १७ साक्षीदार तपासण्यात आले. दि‘ी स्थित सेंट्रल अॅडॉप्शन रीसौर्स अथोरिटीचे अध्यक्ष रामचंद्र रेड्डी यांना डॉ. अरुण पाटील यांच्या दवाखान्यात अर्भक विक्री होते अशा संदर्भात फोटो कोणीतरी पाठवला होता. त्यानुसार ६ फेब‘ुवारी २०१८ रोजी सेंट्रल अॅडॉप्शन रीसौर्स अथोरिटीचे अधिकारी, कोल्हापूर येथील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व त्यांच्या टीमने डॉ. पाटील यांच्या दवाखान्यावर धाड टाकली. तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर नामदेव दाते यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये संशयीतांच्या विरोधात फिर्याद दिली. संशयीतांना अटक करुन त्यांच्या विरोधात तब्बल तीन वेगवेगळे तपास अधिकार्यांनी तपास केला. तर डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले. सरकार पक्षतर्फे तपासण्यात आलेल्या १७ साक्षीदार तसेच पिडीत अल्पवयीन मुलगी, तिची मामी व हॉस्पिटल स्टाफ यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या.
संशयितांच्या वतीने अॅड. मेहबूब बाणदार यांनी उलट तपासात धाड टाकण्याचे अधिकार असलेबाबत कोणतेही कागद नाहीत, फोटो वरून अर्भक विकण्यात आले अथवा दत्तक देण्यात आले हे दिसत नाही, डॉ. पाटील यांचे विरोधात कोणाही स्थानिकाची तक‘ार नाही, आयपीसी ३७० चे घटक दिसून येत नाहीत, मुलीची कोणतीही तक‘ार नाही या गोष्टी साक्षीदारांकडून कबुल करण्यात आल्या. बाणदार यांचा उलट तपास व मांडलेला युक्तिवाद न्यायालयाने ग‘ाह्य मानून सरकार पक्षास संशयितांच्या विरोधात सबळ पुरावा देता आला नाही, तसेच गुन्ह्याचे घटक साबित होत नाहीत हा निष्कर्ष मानून सर्व संशयितांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. अर्भक खरेदी घेणेचा आरोप असणारे चहांदे दाम्पत्याच्या बाजूने अॅड.बडवे यांनी काम पाहिले.
