Spread the love

एका पत्रकारासह 39 जणांचा मृत्यू

इसायल / महान कार्य वृत्तसेवा

इसायलकडून गाझावर बॉम्बहल्ले सुरुच आहेत. इसायली सैन्याने खान युनिसमधील नास्सर मेडिकल कॉम्प्लेक्सवर बॉम्बहल्ला केलाय. यामध्ये एका पत्रकाराचा मृत्यू झालाय. प्रेेरह ऐत्रग्प् असं या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पत्रकाराचं नाव आहे. यापूर्वीच्या दिवशी इसायलने गाझामधील विद्यापीठाच्या इमारतीवरही हल्लेकेले होते. गेल्या काही दिवसांमध्ये गाझा पट्टीत किमान 39 लोक ठार झाले होते.

इसायलने मानवतावादी मदत अडवल्याने गाझामध्ये भीषण अन्नटंचाई

युएन चे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी इसायलने गाझावर लादलेली नाकाबंदी त्वरित हटवावी, अशी मागणी केली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून इसायलने गाझाकडे जाणारी मानवतावादी मदत थांबवली आहे. त्यामुळे गाझामध्ये भीषण अन्नटंचाई निर्माण झाली आहे. ुत्दंरत् प्ल्हुी निरीक्षक असलेल्या संस्थेने सांगितले की, गाझामधील अन्नटंचाई भीषण आहे.

इसायलच्या हल्ल्यामुळे गाझाच्या हॉस्पिटलमधील दोन रुग्ण ठार

गाझामधील आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जारी करून सांगितले आहे की, इसायलच्या ”क्रूर” हल्ल्यात नास्सर मेडिकल कॉम्प्लेक्समधील दोन रुग्ण ठार झाले, तर इतर रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचारी जखमी झाले. निवेदनात म्हटले आहे की, ”रुग्णालयांवर पुन्हा पुन्हा केले जाणारे हल्ले आणि उपचार सुरू असलेल्या खोल्यांमध्ये जखमी रुग्णांचा पाठलाग करून त्यांची हत्या करणे हे दर्शवते की, इसायली सैन्यांकडून आरोग्य व्यवस्था उद्ध्‌‍वस्त करण्याचा आणि आजारी व जखमी लोकांचे उपचारही धोक्यात आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे.

इसायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले की, ते शस्त्रसंधीच्या चर्चेसाठी मध्यस्थांना कतारला पाठवणार आहेत. याआधी हमासने एक अमेरिकन-इसायली सैनिकाची सुटका केली होती. नेतान्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्यपूर्व दौरा पूर्ण होईपर्यंत इसायल गाझाझी सुरु असलेले युद्ध पुढे ढकलणार आहे.

गाझा आरोग्य मंत्रालयानुसार, इसायल सोबतच्या युद्धात आतापर्यंत किमान 52,862 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले असून 1,19,648 जखमी झाले आहेत. सरकारच्या मीडिया कार्यालयाने मृतांचा आकडा 61,700 पेक्षा जास्त असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे, कारण हजारो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली बेपत्ता असून त्यांना मृत समजले जात आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या नेतृत्वाखाली इसायलवर झालेल्या हल्ल्यांमध्ये अंदाजे 1,139 लोक ठार झाले आणि 200 हून अधिक लोकांना बंदी बनवण्यात आले.