Spread the love

दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ (ध्जीरूग्दह एग्ह्‌‍ददी) राबवून पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्‌‍वस्त केले होते. यामध्ये सीमारेषेपासून 100 किलोमीटर आत असलेल्या बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेच्या तळाचाही समावेश होता. भारताने क्षेपणास्त्र डागून हे सर्व तळ उद्ध्‌‍वस्त केले होते. यामध्ये जवळपास 100 दहशतवादयांचा खात्मा झाला होता. भारतीय सैन्याच्या या कारवाईमुळे पाकिस्तान चांगलाच चवताळला होता. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने 7 ते 10 मे या कालावधीत भारतावर ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हा हल्ला परतावून लावत पाकिस्तानवर प्रतिहल्ला चढवला होता. भारताच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे 11 हवाई उद्ध्‌‍वस्त झाले होते. यावेळी 11 पाकिस्तानी सैनिकांचाही मृत्यू झाल्याची कबुली पाकच्या सैन्याने दिली आहे. तसेच भारताच्या हल्ल्यात आपले 78 सैनिक जखमी झाल्याचेही पाकिस्तानकडून सांगण्यात आले. ऑपरेशन सिंदूरमध्ये एकूण 51 जण मारले गेल्याचं पाकिस्तानने म्हटलंय. त्यातले 11 सैनिक आहेत. त्यात 6 पाक्तािन आर्मीचे तर 5 पाकिस्तान वायुदलाचे सैनिक आहेत.

भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या सैनिकांमध्ये स्क्वार्डन लीडरचाही समावेश आहे. अब्दुल रहमान, दिलावर खान, इकरामुल्ला, खालिद, मुहम्मद अदील अकबर, निसार आणि स्क्वार्डन लीडर उस्मान युसूफ, मुख्य तंत्रज्ञ औरंगजेब, नजीब, कॉर्पोरेल तंत्रज्ञ फारुख आणि वरिष्ठ तंत्रज्ञ मुबाशिर यांचा मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराकडून देण्यात आली आहे. पाकिस्तानी वायूदलाचा स्क्वार्डन लीडर उस्मान युसूफ याच्यासह हवाई दलातील ते पाच सैनिक मेले आहेत, ते जकोकाबाद एअरबेसवर तैनात होते. उस्मान युसूफ आणि त्याचे सहकारी जेएफ-17 विमानाने हवेत उड्डाण करण्याच्या तयारीत होते. त्यावेळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाई तळावर हल्ला चढवला. भारतीय हवाई दलाच्या या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या लष्करी तळावरील यंत्रणेचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या हवाई तळांवर रॉकेटसचा मारा केल्याने येथील धावपट्टी उखडली गेली होती. हीम यार हवाई तळाचे मोठे नुकसान झाले आहे. येथील विमानांसाठीची धावपट्टी क्षेपणास्त्रांमुळे पूर्णपणे बेचिराख झाली होती. त्यामुळे याठिकाणहून लढाऊ विमानांना उड्डाण करणे शक्य नव्हते. भारतीय वायूदलाने हा हल्ला करुन पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलत मोठा धक्का दिला होता.