उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्या नेतृत्वाखाली नवीन समिती नेमा : डॉ.महेशकुमार कांबळे
मिरज / महान कार्य वृत्तसेवा
मिरज सिव्हिल मधील शासकीय ३ दिवसाच्या बाळाचे अपहरण प्रकरणी अधिष्ठाता डॉ.प्रकाश गुरव रजेवर असताना तत्कालीन प्रभारी अधिष्ठाता डॉ.अहंकारे यांनी गठीत केलेली चौकशी समिती आणि या समितीने तयार केलेला चुकीचा अहवाल अंमलात न आणता पुन्हा नव्याने उपजिल्हाकारी दर्जाचे अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांची संयुक्त चौकशी समिती गठीत कडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी संघर्ष सफाई संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ.महेशकुमार कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या प्रकरणात३ दिवसाच्या बाळाचे अपहरण झाले. त्यादिवशी या वार्डात ६० ते ६५ रुग्ण होते व या प्रत्येक रुग्णांसोबत २ ते ३ नातेवाईक या वार्डात राहत होते, म्हणजेच या वार्डात एकुण रुग्णांसहीत २०० ते २५० लोकांची वरदळ (ये-जा) होती आणि या वार्डात ५ विभागाचे वेगवेगळे नर्सेस व कर्मचारी व डॉक्टर्स व इतर कर्मचारी कर्तव्य बजावत होते. पण या एकत्रीत विभागात रुग्णाच्या नातेवाईकांची चौकशी करुन आत सोडणे किंवा बाहेर सोडणे हे काम महिला व पुरुष सुरक्षा रक्षकांचे होते. पण या विषयात या सुरक्षा रक्षकांचे अपयश स्पष्ट दिसुन येत आहे. दरम्यान प्रभारी अधिष्ठाता डॉ.अहंकारे यांनी वरीष्ठ अधिकारी आणि कार्यालयाला समिती गठीत करण्याचे कळविले अथवा याची कागदोपत्री समिती गठीत केली होती. का तसा अहवाल दिला होता का संबंधित सर्वांचे जाब जबाब नोंदविले होते का सदरच्या अहवालावरून एक परिसेविका आणि 5 नर्सेस यांना दोषी धरण्यात आले या बाबतसर्वांची योग्य चौकशी होणे गरजेचे असल्याचे डॉ महेशकुमार कांबळे यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.
