मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार 13 मे 2025 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांना ग्ुग्त्दम्ज्ञी ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका डाऊनलोड करुन ठेवता येईल. परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची सोय मंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन बघता येणार आहे. शाळांना त्यांचा एकत्रित निकाल शाळेच्या लॉगिनमध्ये पाहता येईल.