नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीबाबत स्वत:च एक्स मीडियावर घोषणा केल्यानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यानंतर पुन्हा त्यांनी दोन्ही देशातील शस्त्रसंधीबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. अमेरिका दोन्ही देशांना ऐतिहासिक आणि धाडसी निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकते, असे ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटलं, भारत आणि पाकिस्तानच्या मजबूत नेतृत्वाचा मला खूप अभिमान आहे. त्यांनी सामर्थ्याचा, शहाणपणाचा आणि धैर्याचा वापर करून वाढत्या तणावाला थांबवण्याची वेळ आल्याचे ओळखले. दोन देशामधील तणावात लाखो लोकांचा मृत्यू होऊन विनाश होऊ शकला असता. यामध्ये लाखो निष्पाप लोक मारले जाऊ शकले असते. तुमच्या धाडसी कृतीने तुमचा वारसा आणखी बळकट झाला आहे.
दोन्ही देशांसोबत व्यापर वाढविणार- पुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे म्हटले , अमेरिका तुम्हाला या ऐतिहासिक आणि धाडसी निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकते, याचा मला अभिमान आहे. मी दोन्ही देशांसोबत व्यापार वाढवणार आहे. याशिवाय, हजारो वर्षांनंतर काश्मीर समस्येवर तोडगा निघू शकतो का? हे पाहण्यासाठी मी तुम्हा दोघांसोबत (पाकिस्तान आणि भारत) काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. या अद्भुत कार्यासाठी ईश्वर भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाला आशीर्वाद देवो!
1000 वर्षे जुना संघर्ष नाही- डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थीची ऑफर केल्यावरून काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, हा बायबलमध्ये वर्णन केलेला 1000 वर्ष जुना संघर्ष नाही. तर 78 वर्षांपूर्वी काश्मीरचा वाद सुरू झाला आहे. राज्यसभेचे काँग्रेसचे खासदार जयराम रमेश म्हणाले, भारतानं शिमला करार सोडला आहेे? आपण तृतीय पक्षाच्या मध्यस्थीसाठी दार उघडले आहे का? जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावर भारतानं कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाला वारंवार नकार दिला आहे. काश्मीर हा प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे, हे भारतानं स्पष्टपणं सांगितलं आहे. शनिवारी, भारतानंही पाकिस्तानबरोबरील शस्त्रसंधीची माहिती देताना अमेरिकेचा उल्लेख टाळला होता. दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये एक सामंजस्य झाल्याचं भारतातकडून सांगण्यात आले.
नवी दिल्ली- भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीबाबत स्वत:च एक्स मीडियावर घोषणा केल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यानंतर पुन्हा त्यांनी दोन्ही देशातील शस्त्रसंधीबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. अमेरिका दोन्ही देशांना ऐतिहासिक आणि धाडसी निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटलं, भारत आणि पाकिस्तानच्या मजबूत नेतृत्वाचा मला खूप अभिमान आहे. त्यांनी सामर्थ्याचा, शहाणपणाचा आणि धैर्याचा वापर करून वाढत्या तणावाला थांबवण्याची वेळ आल्याचं ओळखलं. दोन देशामधील तणावात लाखो लोकांचा मृत्यू होऊन विनाश होऊ शकला असता. यामध्ये लाखो निष्पाप लोक मारले जाऊ शकले असते. तुमच्या धाडसी कृतीनं तुमचा वारसा आणखी बळकट झाला आहे.