शाहूवाडी / महान कार्य वृत्तसेवा (विकास कांबळे)
तालुक्याच्या डोंगर दऱ्याखोऱ्यांत व सहयाद्री पठारावर राहणारे धनगर समाजातील बांधव यांचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे रानमेवा रान मेव्यांची विक्री करून कुटुंबाचा गाडा चालवला जातो येथील महिला डोक्यावरती रानमेव्यांची टोपली घेऊन सध्या गावोगावी मुंबईकर आले असल्याने त्यांना हा मेवा गल्लोगल्ली पोहचवण्याचे काम करत आहे ‘जांभळे घ्या, नेरली घ्या, तोरणं घ्या अशा आरोळ्या देत डोंगराचा रानमेवा विकताना चे चित्र ग्रामीण भागातील गावागावात पाहायला मिळत आहे यावरच धनघर बांधवांच्या कुटुंबाचा उद्धार निवारा चालत आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात सहयाद्री पठार व डोंगर भागात तोरणं ,जांभळं, करवंदे, नेरली असा जंगलातील झाडाना रानमेवा लागला आहे जंगलात राहणारे धनगर बांधव काट्या कुट्याची पायवाट तुडवत रानमेवा एकत्र करतात तोच रानमेवा डोंगर कपाऱ्यातील भागातून जमा करतात आणि धनगर वाड्या वस्तीतील महिला सात-आठ किलोमीटर पायपीट करून तालुक्यातील गावोगावी रान मेवा विक्री करताना दिसत आहे. विक्री करून जमा झालेल्या पैशामध्ये आपला संसाराचा गाडा चालवतात या महिन्याच्या शेवट काही दिवसांनी पुर्ण झाला कि पुढे काही दिवसाच्या तोंडावर येणाऱ्या पावसाळ्यासाठी लागणाऱ्या प्रपंचाचे साहित्य खरेदी केले जाते.
शाहुवाडी तालुक्यातील रानमेवा जणू त्यांच्या जगण्याचा आधारच बनला आहे धनगर वाड्यातील महिला रानमेव्यावर कसेबसे आपले घर चालवत असतात आता मे महिन्यामध्ये शाळेला सुट्टी असल्यामुळे मुंबईकर गावाला येऊन लागले असल्याने त्यांना गावाकडची काळी मैना काय असते ते त्यांच्या मध्यामातून मुंबईतील गावी आलेल्या लोकांना माहित पडते धनगर बांधव आपला जमा केलेला रानमेवा विक्रीला गावामध्ये घेऊन जातात मुंबईतील शाळेला सुट्टी असल्यामुळे गावच्या ठिकाणी आराम व वातावरणाचा आनंद घेण्यासाठी गावाकडे मुंबईकर मे महिन्यात येत असतात येथील ग्रामीण भागातील वातावरणात सर्व मुंबईकर गुंग झालेल असताना दिसतात
ग्रामीण भागामध्ये अजूनही तांदूळ, मका, नाचणी सारखे धान्य रानमेवा विकणाऱ्या ना धान्य देऊन धान्याच्या बदल्यात रानमेवा घेतला जातो आणि रानमेवा विकल्यानंतर येणाऱ्या धान्य व पैशातून घरच्या मुलांच्या शालेय शिक्षणासाठी व घरगुती साहित्य खरेदी करतात दरवर्षी एप्रिल महिन्यात ते जूनच्या पहिल्या आठवड्यात रानमेव्याचा हंगामा चालू असतो सध्या जंगलात वन्यप्राणी चे प्रमाण वाढल्यामुळे आणि जंगलात वनव्यांच्या भक्ष्यस्थानी रानमेवा पडला आहे उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि गावाकडील वातावरणाचे दिवस बदलत चाले आहे कधी उष्ण तर कधी ढगाळ आणि रिमझिम पावसाच्या सरी यांमुळे ग्रामीण भागातील लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे तरी देखील सुट्टीच्या दिवसात पर्यटक फिरण्यासाठी येत आहेत शालेय मुले शाळांना सुट्ट्या पडल्यामुळे रानमेण्याचा आनंद घेताना दिसत आहे तसेच काही शालेय विद्यार्थी रस्त्याच्या दोन्ही बाजूला किंवा तालुक्याच्या ठिकाणी रानमेवा विकत असताना चे दृश्य पाहायला मिळतात
कोट –
जंगलामध्ये फिरून रानमेवा जमा करायचा आणि ग्रामीण भागातील गावोगावी जाऊन विकायचा हे काम धनगर बांधवांच्या महिला वर्ग जास्त करतात रानमेवा त्यांच्या जगण्याचा आधार आहे या रानमेव्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून पावसाळ्यात नियोजन चालवले जात आहे – रावसाहेब पोळ ( ग्रामविकास अधिकारी)

