Spread the love

महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी ,अन्यथा आंदोलनाचा इशारा

इचलकरंजी : महान कार्य वृत्तसेवा

येथील कुडचे नगर परिसरातील सिमेंट गल्लीत पाईपलाइनच्या तांत्रिक अडचणींमुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.त्यामुळे आधीच चार दिवसातून एकदा येणारे पाणी आणि त्यात अपुरा पाणी पुरवठा ही पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर करणारी ठरली आहे.त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या अधिका-यांनी या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने योग्य उपाययोजना करुन या परिसरात सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध करुन द्यावा ,अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी विशेषतः महिलांनी दिला आहे.

येथील कुडचे नगर परिसरातील सिमेंट गल्लीत गेल्या काही वर्षांपासून पाइईपलाईनची तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.याचा परिणाम ,याठिकाणच्या नागरिकांना कमी दाबाने तर ब-याचदा पाणीच येत नाही.त्यामुळे आधी चार दिवसातून एकदा पाणी आणि त्यात कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने बहुतांश नागरिकांना पाणीच मिळत नाही.त्यामुळे याठिकाणच्या नागरिकांना पाणी टंचाई ही पाचवीलाच पुजली आहे ,अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.ही समस्या महापालिका प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निदर्शनास आणून दिली आहे.तरी देखील याबाबत ठोस कार्यवाही होत नसल्याने पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर बनली आहे.पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून कुपनलिकेचा हातपंप असला तरी त्यालाही ब-याच मर्यादा असल्याने पिण्याबरोबर वापरासाठी पाणी टंचाईची समस्या आता नित्याचीच बनली आहे.याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देवून नागरिकांना सुरळीत मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध करुन द्यावा ,अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही
नागरिकांनी दिला आहे.