Spread the love

दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

एलोन मस्क यांच्या स्टारलिंकला भारताच्या दूरसंचार विभागाकडून सॅटेलाइट संचार सेवांसाठी अधिकृत पत्र मिळालं आहे. राष्ट्रीय सुरक्षा नियमांचं पालन करण्याचं मान्य केल्यानंतर हा परवाना देण्यात आला. स्टारलिंक भारतात विशेषत: दुर्गम भागात सॅटेलाइट बॉडबँड सेवा प्रदान करणार आहे, ज्यामध्ये घरगुती आणि मोबाइल कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित असेल. स्पेक्ट्रम वाटप आणि नियामक मंजुरी मिळाल्यानंतर स्टारलिंक भारतातील पहिली कंपनी बनू शकते जी स्थिर आणि मोबाइल दोन्ही सॅटेलाइट सेवा देईल.

राष्ट्रीय सुरक्षा नियम

एलोन मस्कच्या स्टारलिंकला भारतात त्यांच्या उपग्रह इंटरनेट सेवा ऑपरेट करण्यासाठी दूरसंचार विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. ”होय, स्टारलिंकला भारतातील उश्झ्ण्ए, %एअऊ आणि घ्एझ् परवान्यांसाठी डॉटनं थ्दघ् जारी केलं आहे,” असं एका सरकारी अधिकाऱ्यानं मनीकंट्रोलला सांगितले. ”स्टारलिंक सर्व परवाना अटी पूर्ण करण्यास सक्षम झाल्यानंतर अंतिम परवाना दिला जाईल,” असं सूत्रांनी सांगितलं. स्टारलिंकनं डेटा भारतातच राहील याची खात्री, स्थानिक डेटा सेंटर्सचा वापर, आणि मोबाइल टर्मिनल्ससाठी प्रत्येक 2.6 किमी किंवा प्रत्येक मिनिटाला स्थान ट्रॅकिंग यासारख्या 29 नवीन सुरक्षा अटी मान्य केल्या आहेत.

परदेशी गुंतवणूक

भारतीय बहुसंख्य भागधारकतेची अट रद्द; 100म परदेशी गुंतवणुकीला परवानगी.

मोबाइल सेवा

स्टारलिंकला उश्झ्ण्ए परवान्यासह मोबाइल सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्याची परवानगी मिळण्याची शक्यता, ज्यामुळं ती युटेलसॅट वनवेब आणि जिओ-एसईएसपेक्षा वेगळी ठरेल.

मर्यादित प्रभाव

केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी सांगितलं की, स्टारलिंक मुख्यत: दुर्गम भागात घरगुती कनेक्टिव्हिटीसाठी उपयुक्त असेल आणि पारंपरिक नेटवर्कपेक्षा 10 पट महाग आहे, त्यामुळं बाजारात मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे. स्टारलिंकला घ्ऱ्-एझ्अण कडून मंजुरी आणि ऊींअघ् कडून स्पेक्ट्रम वाटपाची आवश्यकता आहे.

भारतातील स्पर्धा

अँमेझॉनचा प्रोजेक्ट कुइपर आणि ग्लोबलस्टारसारख्या कंपन्या देखील भारतीय बाजारपेठेत उतरण्याच्या तयारीत आहेत. स्टारलिंकनं रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल यांच्याशी करार केले आहेत.