सिंधुदुर्ग / महान कार्य वृत्तसेवा
शक्तिपीठ महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 गावांमधून जाणार आहे. यासाठी लोकांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित केली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यात येतील. विरोधाला विरोध करणाऱ्यांना, विकासात आडवे येणाऱ्यांना फटके देऊ, असे वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी केले आहे. तर जगलं कोणी राखत नाही, ती आपोआप राखली जातात. वन्यजीव ती राखतात अस देखील राणे म्हणाले आहेत. सिंधुदुर्गातील सावंतवाडी येथे आयोजित जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाला अनेक जिल्ह्यातून विरोध होताना दिसून येत आहे. यात शेतकरी आणि नागरिकांनी रस्त्यावर उतरत तीव विरोध केला आहे. तर दुसरीकडे या मुद्यांवर राज्याचे राजकारण देखील तापले आहे. राज्यातील अनेक तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या हा शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्ग (एग्ह्प्ल््ल्ुी) जिल्ह्यातील 12 गावांमधून जाणार आहे. यासाठी लोकांच्या काही समस्यांबाबत माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी माहिती जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी आपले परखड मत मांडले आहे.
सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्पाला राज्यभरातून विरोध
राज्यात पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने महायुती सरकार सत्तेत आलं आहे. अशातच राज्य सरकारचा अतिशय महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तिपीठ महामार्ग हा कोणत्याही परिस्थितीत करायचा असा निर्धार सरकारकडून व्यक्त केला जात आहे. असे असलं तरी नागपूर ते गोवा जाणाऱ्या या महामार्गाला आता राज्यभरातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून विरोध होताना दिसत आहे. या विकासकामाच्या विरोधात शेतकरी सुद्धा आक्रमक झाला आहे
कोणत्या जिल्ह्यामंधून जाणार होता शक्तीपीठ महामार्ग?
सहा पदरी असणारा हा महामार्ग राज्यातील वर्धा, , नांदेड, परभणी, , धाराशिव, यवतमाळ, हिंगोली बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार होता. या महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असतील तर 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असा प्रस्ताव होता.
कोणत्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा होता शक्तीपीठ महामार्ग?
शक्तीपीठ महामार्गाने कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई , तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तिपीठे जोडली जाणार आहेत. यासोबतच परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांना हा महामार्ग जोडला जाणार आहे. याशिवाय पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, नांदेडमधील गुरु गोविंदसिंग महाराजांचे गुरुद्वारा, सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर, पट्टणकोडोली, कणेरी, आदमापूर तीर्थक्षेत्रांना जोडला जाणार होता.
