मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
अलीकडेच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. मात्र त्यानंतर सातत्याने मौल्यवान धातुच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशातंर्गंत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आजही मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोनं महागलं आहे. आज जवळपास 1 टक्क्यांपर्यंत सोनं वधारलं आहे. गेल्या महिन्यात सोन्यात जवळपास 7 टक्क्यांपर्यंत तेजी नोंदवली होती. यामुळं गुतंवणुकदारांसमोर चांगला पर्याय उपलब्ध झाला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात मजबुती दिसत असल्याचे पाहायला मिळते. कॉमेक्सवर सोनं $3,280 प्रति औंसवर पोहोचले आहे. ज्यामुळं आज $21 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चीन आणि अमेरिके यांच्यातील राजकीय तणाव आणि अमेरिकेत व्याज दरातील अनिश्चित्ता आहे. फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करण्याची शक्यता असल्याने गुंतवणुकदरात चिंता वाढली आहे. त्यामुळं सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. आज सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली असून 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 87,750 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 22 कॅरेट सोन्यात 220 रुपयांची वाढ झाली असून 95,730 रुपये प्रतितोळा इतकी सोन्याची किंमत आहे.
दुसरीकडे चांदीच्या दरातही चढ-उतार होताना दिसत आहे. र्श्ण्ें वर चांदीचा भाव 93,000 प्रति किलोच्या आसपास आहे. यात देशांतर्गंत बाजारात हलकी घट झाली आहे. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किंमतीत जवळपास 0.5 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली होती. कॉमेक्सवर चांदी त्र्33 प्रति औंसच्या जवळपास पोहोचली आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 87,750 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 95,730 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 57,440 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 8,775 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 9,573 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,180 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 70,200 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 76,584 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 57,440 रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 87,750 रुपये
24 कॅरेट- 95,730 रुपये
18 कॅरेट-57,440 रुपये
