पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा इशारा
कोल्हापूर/ महान कार्य वृत्तसेवा
कर्नाटक सरकारचा अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी अट्टाहास कायम आहे. या संदर्भात कायदेशीर हालचाली करण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सुद्धा इशारा दिला आहे. जर कर्नाटक सरकार वकील आणि जलतज्ज्ञांची फौज उभा करत असेल, तर आम्ही देखील त्या विरोधात तशीच वकिलांची आणि जलतज्ञांची फौज उभा करू, असा इशारा दिला आहे. अलमट्टीमधील पाणी विसर्गाबाबत सध्या दोन्ही पातळ्यांवर चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याबाबत सर्व संबंधित राज्यांची 15 दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन केंद्र सरकारने कर्नाटकच्या शिष्टमंडळाला दिले आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या चारही राज्यांचा या धरणाची उंची वाढविण्याला विरोध असल्याने अलमट्टीचा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. अलमट्टीची उंची वाढविण्याला कृष्णा पाणी वाटप लवादाने परवानगी दिली आहे. त्यामुळे धरणाची उंची 519 मीटरवरून 524 मीटरपर्यंत वाढविण्याबाबतची अधिसूचना जारी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन केली आहे.