मराठा समन्वयकांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट
कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्ह्यात कुणबी दाखले देण्याच काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका मराठा समाजातील नोंदी सापडलेल्या कुटुंबांना बसत आहे या संदर्भात मराठा समन्वयकांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन गाऱ्हाणी मांडली.
या संदर्भात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावून कोल्हापूर जिल्ह्यातील तालुकावार कुणबी दाखल्या संदर्भात सर्व अडचणी दूर करू असे आश्वासन त्यांनी समीतीस दिले.
यावेळी राज्य समन्वयक हणमंत पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष भगवान कोईगडे, दत्ताञय दिक्षित, मानसिंग देसाई, नंदू शिंदे, प्रकाश पाटील, विजय वाडकर सह अन्य मराठा समन्वयक उपस्थित होते.
