पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा
नागाव (ता.हातकणंगले) येथील माळवाडी भागात राहणाऱ्या ओम तानाजी सावंत (वय 17) या अल्पवयीन युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी दुपारी 3 च्या दरम्यान घडली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
ओम ने प्रेमप्रकणातून आत्महत्या केली असल्याची चर्चा गावात दबक्या आवाजात सुरू होती. ओमच्या अशा अनपेक्षित जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत होती. त्याच्या पश्चात
आई, वडील, बहीण, असा परिवार आहे. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.
