Spread the love

हॉलिवूड हादरलं

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

हॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका आणि लेखक जिल सोबुले हिचं घरात आग लागल्याने निधन झालंय. जिल सोबुल हॉलिवूडमधील एक मोठं नाव होतं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण  अमेरिकेन सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. जिल सोबुली हिला ‘आय किस्ड अ गर्ल’ या गाण्याने सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली होती. एवढेच नाही तर ती 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय सिंगर होती. मात्र, गुरुवारी एका दुर्घटनेमुळे तिचा दुर्दैवी अंत झालाय.

जिल सोबुले या गायकेचा मृत्यू तिच्या घरात लागलेल्या आगीमुळे झालाय. शुक्रवारी तिच्या गावी तिला एक कार्यक्रम सादर करायचा होता. या प्रकरणाबद्दल गायकेच्या व्यवस्थापकाने काय म्हटले आहे ते जाणून घेऊयात..

सोबुले ही हॉलिवूडची सुप्रसिद्ध सिंगर होती. एकेकाळी अमेरिकेत तिच्या आवाजाची जादू होती. जगभरात तिचे चाहते होते. दरम्यान, शुक्रवारी पुन्हा एकदा सोबुले तिच्या गावी म्हणजे होम टाऊनला जाऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी गाणी सादर करणार होती. मात्र, त्यापूर्वीच घराला लागलेल्या आगीत त्यांचा दुर्दैवी अंत झालाय. मिडिया रिपोर्टनुसार, सोबुले हिच्या मिनेसोटा येथील घराला गुरुवारी (दि.2) मोठी आग लागली आणि या आगीत तिचा मृत्यू झालाय.

जिल सोबुले यांचे व्यवस्थापक जॉन पोर्टर यांनी या माहितीची पुष्टी केली आहे. गायिकेच्या वेबसाइटनुसार, जिल शुक्रवारी, 2 मे रोजी तिच्या गावी डेन्व्हरमध्ये स्टेजवर ती गाण्यांचे सादरीकरण करणार होती. तिला 2023 मध्ये ड्रामा डेस्क अवॉर्डसाठी नॉमिनेट करण्यात आले होते. जिल सोबुले 90 च्या दशकापासून संगीत क्षेत्रात सक्रिय आहेत आणि तिच्या गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकत आहेत. ‘आय किस्ड अ गर्ल’, ‘क्लुलेस’ आणि ‘सुपरमॉडेल’ अशा गाण्यांमुळे तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली होती. 1990 मध्ये तिने तिचा पहिला अल्बम ‘थिंग्ज हियर आर डिफरंट’ रिलीज केला. यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. जिल सोबुले तिच्या गायन शैलीसाठी ओळखली जात होती.

तिने नेहमीच तिच्या गाण्यांमधून महिलांना सक्षम आणि मजबूत व्यक्तिमत्त्वाच्या रूपात चित्रित केले.  90 च्या दशकात ‘आय किस्ड अ गर्ल’ बनवले, त्यावेळी अशी गाणी क्वचितच बनवली जात असतं. 1990 नंतरही त्यांनी अनेक अल्बम रिलीज केले आणि चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांसाठी गाणी तयार केली. 2023 मध्ये त्यांनी एक नाटकही लिहिले. हे नाटक तिच्या बालपणावर आधारित होते आणि लोकांना ते खूप आवडले.