Spread the love

उंचीला विरोध करा : धनाजी चुडमुंगे 

औरवाड/महान कार्य वृत्तसेवा

2005 पूर्वी कोणी स्वप्नातही विचार केला नसेल की, या भागाला महापूराचे ग्रहण लागेल. पण ते लागले याचं कारण हे आलमट्टी धरण आहे. अजून वेळ गेलेली नाही. आलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंची वाढवण्यास विरोध करा. आता पण थंड बसाल तर सांगली कोल्हापूर सह शिरोळ तालुक्याचे भविष्य आंधकारमय असेल, असे प्रतिपादन धनाजी चुडमुंगे यांनी केले.

सोमवार (दि.28) रोजी औरवाड येथील मराठा भवन येथे झालेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दिलीप मंगसुळे होते.

आलमट्टी उंची विरोधात केंद्र सरकारकडे नागरिकांच्या हरकती दाखल करून घेण्याचे अभियान आंदोलन अंकुशकडून राबविले जात आहे. त्या अनुषंगाने औरवाडमध्ये झालेल्या बैठकीत बोलताना चुडमुंगे पुढे म्हणाले की, आपल्या भागात लागोपाठ येणाऱ्या महापुरास आलमट्टी धरणच जबाबदार असून जर या धरनाची उंची आणखी वाढवली गेल्यास हा भाग पावसाळ्याच्या काळात दरवर्षी पाण्यात राहील आणि त्यामुळे शेतीचे घराचे दरवर्षी नुकसान होणार आहे. या भागाचे अस्तित्वचं नष्ट करू पाहणारे हे संकट ओळखा आणि आत्ताच या धरणाच्या उंचीला प्रत्येक नागरिकाने विरोध करावा असे आवाहन शेवटी त्यांनी केले.

स्वागत चिदानंद सर यांनी केले. यावेळी रामदास गावडे, धोंडीराम चांदुरे, भास्कर गावडे, मनोहर गावडे, राजू गावडे, बजरंग परीट, नितीन रावण, बाळासो लोहार, प्रकाश सूर्यवंशी, प्रवीण अनुजे, शिवलिंग जंगम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या विविध विभागाना शिरोळ तालुक्यातून आत्तापर्यंत 400 हरकती पाठवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. किमान 1000 हरकती शिरोळ तालुक्यातून जातील असा आमचा प्रयत्न आहे. त्याला 100 टक्के पूरग्रस्त असलेल्या शेडशाळ गावाने साथ द्यावी, अशी विनंतीही त्यांनी शेडशाळ येथील महादेव स्वामी मठात घेण्यात आलेल्या बैठकीत केली.