Spread the love

कुंडल येथे घडलेल्या घटनेची पहाणी
कुंडल/महान कार्य वृत्तसेवा
ललित गांधी अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र व सदस्य महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग यांनी कुंडल तीर्थ क्षेत्राची पाहणी केली. प्रारंभी संस्थेचे सचिव दीपक वर्णे कुंडल यांनी सर्व घटनेचा वृतांत कथन केला सर्व प्रशासन मदत करीत असलेचे स्पष्ट केले.
ललित गांधी यांनी पोलीस निरीक्षक कुंडल जयसिंग पवार तसेच तहसीलदार पलुस दीप्ती रिठे यांना अत्यंत बारकाईने शोध घेणेबाबत सुचना दिल्या. व या तपासाकामी सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा व संसाधनांचा वापर करून जलद गतीने तपास करावा, असे निर्देश ही ललित गांधी यांनी याप्रसंगी दिले. यावर पोलीस निरीक्षक जयसिंग पवार कुंडल यांनी तपासा बाबतची संपुर्ण माहिती दिली.
कुंडल नगरीतील कलिकुंड पार्श्वनाथ मंदिराचे दर्शन घेतले. त्यावेळी शांतीकलश देवुन विश्वस्त दीपक वर्णे यांनी त्यांचा बहुमान केला. या प्रसंगाचे औचित्य साधुन महाराष्ट्र शासनाने झरि पार्श्वनाथ ते गिरी पार्श्वनाथ दगडी पायरी रस्त्याचे प्रस्तावास मान्यता दिली, असलेचे निदर्शणास आणुन दिले.त्यावेळी सदरचा प्रस्ताव महामंडळाकडे सादर करणे बाबतच्या सुचना दिल्या.
यावेळी समृद्धि उद्योग समुहाचे प्रमुख रमाकांत मालू, रमेश आरवाडे, स्वप्निल शहा, देशभूषण पाटील यांचाही बहुमान करणेत आला. याप्रसंगी सुकुमार उपाध्ये, अजित पाटील, व्यवस्थापक दर्शन हनगंडी उपस्थित होते.