हातकणंगले/महान कार्य वृत्तसेवा
नरंदे (ता. हातकणंगले) येथील रोहित रामचंद्र कुंभार (वय २२ ) या तरुणाने स्वःताच्या हॉटेल कुंभारवाडा नावाने असलेल्या किचनच्या कौलारु शेडमधील वाश्याला मफलरने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान घडली आहे. याबाबतची फिर्याद मयताचा भाऊ सचिन रामचंद्र कुंभार यांनी हातकणंगले पाेलीस ठाण्यामध्ये दिली आहे. रात्री उशिरापर्यंत त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मयत रोहीत कुंभार याचा हॉटेल कुंभारवाडा नावाचे नागनाथ मंदिराजवळ भंडारी यांच्या माळावर हॉटेल होते. तो उत्तम आचारी होता. सर्वांशी आपुलकीने वागत असल्याने त्याचे हॉटेल अल्पवधीतच नावारूपास आले होते. त्याच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजय असा अन्य नातेवाईकांचा परिवार आहे.
