Spread the love

हेरले /प्रतिनिधी
हेरले (ता. हातकणंगले) येथील श्री बीरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. एकसंबा (मल्टी स्टेट ) शाखा हेरलेच्या अध्यक्ष पदी राहुल माळी यांची तर उपाध्यक्ष पदी नारायण खांडेकर यांची निवड करण्यात आली. यावेळी नूतन संचालक नीलेश कोळेकर,श्रीपाल आलमान,दीपक थोरवत,अदिति आलमान,प्रतिक्षा पाटील यांची संचालक पदी निवड करण्यात आली. यासाठी मुख्य कार्यालयातील हेरले शाखा इन्चार्ज एस. एम. डब्ब सर यांचे सहकार्य लाभले. यावेळी शाखा मॅनेजर यलगोंडा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शाखा कर्मचारी विवेक चौगुले, लोकेश खांडेकर व शंकर कोळेकर तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.