Spread the love

बैठकीत गडकऱ्यानी एकत्रीत लढण्याचा केला निर्धार

पन्हाळा/महान कार्य वृत्तसेवा

पन्हाळगड वर्ल्ड हेरिटेज युनोस्कोमध्ये समावेश होत आहे. मराठा लष्करी स्थापत्य शृंखला अंतर्गत पन्हाळा किल्ला या नामांकित स्मारक होत आहे. परंतू यातील नियम अटीने मुळे पन्हाळावासीयांना फटका बसणार आहे. त्यामुळे पन्हाळावासीयांचा विरोध होत आहे. पन्हाळावासीयांनी रविवारी येथील मयूर उद्यानात गडावरील सर्व ग्रामस्थांनी बैठक घेवून कडाडून विरोध दर्शवला.
नुकतेच पन्हाळागडाचा रणसंग्राम लघुपट आधुनिक तंत्रज्ञान १३ डी शो लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पन्हाळागड वर्ल्ड हेरिटेज मध्ये गेल्याची घोषणा केल्याने पन्हाळावासीय ग्रामस्थांनी धास्ती घेतली आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या मे महिन्यात पॅरिसमध्ये अंतिम मीटिंग आहे. जवळ जवळ सर्व निश्चित झाले आहे. जो छत्रपती शिवरायांच्या काळातला पन्हाळगड होता तशाच पद्धतीने करण्याचा आमचा मानस आहे. आम. डॉ. विनय कोरे यांनी सर्व कागदपत्रे नकाशे काढली आहेत असे त्यांनी जाहीर केल्याने एकच खळबळ माजली आहे.
मराठा लष्करी स्थापत्य शृंखला अंतर्गत पन्हाळा किल्ला या नामांकित स्मारक होत आहे. युनेस्कोने श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ गड-किल्ले हे जागतिक वारसा दर्जासाठी मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पने खाली नामांकित केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूचा जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. त्यामध्ये पन्हाळा किल्ल्याचा समावेश आहे. पन्हाळा हा एकमेव असा किल्ला आहे की गडावर वस्ती आहे याबाबत ५ ऑक्टोबर दरम्यान सदस्य वहाजोंग ली (दक्षिण कोरिया) ‘युनेस्को’ची समिती पन्हाळगडावर भेट देवुन गेली आहे. त्यांच्या सूचनेप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे.
वर्ल्ड हेरिटेज चे अटी नियम शर्ती अजून गाववाल्यांना कळाले नाहीत त्यात सुरुवातीचा असणारा जुना नाका तो जमीनदोस्त केला. तसेच आता सध्या पन्हाळगडावरच्या आकाशवाणीचे टावर काढण्यात येणार आहे त्या आकाशवाणी टावर उभा करण्यासाठी त्यांना जोतिबा या ठिकाणी दहा गुंठे जागा देण्यात आले आहे तसेच खाजगी मोबाईल टावर यांना नोटीसा दिले आहेत तसेच लोकांच्या जीवन आवश्यक असणारे गडावरची पाण्याची टाकी सुद्धा काढण्यात येणार आहे.
पन्हाळगडावर १०५२ पासून वस्ती आहे असा गडाचा इतिहास आपल्याला पहावयास मिळतो छत्रपतीं शिवाजी महाराज,संभाजी महाराज यांच्या काळातही वस्ती होती आत्तासुद्धा वस्ती आहे १९५४ ला खास गिरीशस्थान नगरपरिषद स्थापन झाले आहे जर पन्हाळगड वर्ल्ड हेरिटेज चा दर्जा मिळाला संपूर्ण किल्ल्याला तर किल्ल्यावर वस्ती राहू शकत नाही अमनुष्य किल्ला होईल नवीन बांधकाम करता येणार नाही जुने बांधकाम रिपेरी करता येणार नाही कसल्याही प्रकारचे खाद्यपदार्थाची छोटी मोठी दुकाने, स्टॉल, हॉटेल्स लावता येणार नाही तसेच गडावरील तालुकास्तरीय शासकीय कार्यालय हि अन्य ठिकाणी स्थलांतर होणार अशा काही माहितीगारनी माहिती या गाव सभेवेळी दिली.
या सभेवेळी खालील प्रस्ताव मांडण्यात आले. कृती समिती नेमणे ,जुने कागदपत्रे वस्ती असलेली मिळवणे, वर्ल्ड हेरिटेज संदर्भात सर्व कागदपत्र मिळवणे, विविध प्रकारे आंदोलन उभी करणे, गावातील लोकांना जागृत करणे, उच्च न्यायालयात रेट पिटीशन दाखल करणे, जेसलमेल, हम्पी, बदामी , या ठिकाणी भेट देऊन तिथे परिस्थिती पाहणे, इतिहास अभ्यासकरांना भेटणे ,तसेच स्थानिक आमदार खासदारांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणे, पन्हाळगडच्या युनोस्को पासून वाचवा पहिल्या गाव सभेच्या मीटिंगमध्ये ठरले आहे.
यावेळी युनेस्को मुर्दाबाद , युनोस्को आम्हाला मान्य नाही. आम्ही युनेस्को जाणार नाही. गड आहे आमच्या हक्काचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय ,संभाजी महाराज की जय. अश्या ग्रामस्थांनी घोषणा दिल्या.
यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गवंडी, आसिफ मोकाशी ,माजी उपनगराध्यक्ष ,चेतन भोसले ,सुनील हावळ, जमीर गारर्दी, अँड. रवींद्र तोरसे , माजी नगरसेवक, जीवन पाटील, सतीश भोसले ,अख्तर मुल्ला, रामानंद पर्वत गिरी गोसावी, सुनील काशीद रमेश स्वामी, विनोद गायकवाड, राजू सोरटे, मंदार नायकवडी,अमित दळवी, मुबारक मुजावर, धनंजय बच्चे ,प्रकाश गवंडी, दिलीप दळवी, स्थानिक गडावरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते