बेगळुरू/ महान कार्य वृत्तसेवा
कर्नाटकात 27 वर्षीय इसाईल पर्यटकासह दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री तीन वाजणाच्या सुमारास दोन महिलांवर कथित सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. बेंगळुरूपासून जवळपास 350 किमी दूर असलेल्या कोप्पलमध्ये ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी महिलांवर बलात्कार करण्याआधी अन्य तीन पर्यटकांना कालव्यात ढकलून दिले. पीडितांनी दिलेल्या तक्रारीनुसार, यूएसमधील डॅनिअल आणि महाराष्ट्रातील पंकज कालव्यातून सुखरुप बाहेर आले. मात्र, ओडिशाचा रहिवाशी असलेला बिबाशचा मात्र मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. आरोपी अद्याप फरार असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे अश्वासन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोप्पलच्या पोलीस अधीक्षक राम एल अरासिद्दी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सनापुरजवळ पाच लोकांनी दोन महिला आणि तीन पुरुषांनी हल्ला केला. त्यातील दोन परप्रांतीय पर्यटक आहेत. एक अमेरिकन आणि दुसरी महिला इजराईलयेथील आहे. महिलाने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपींनी मारहाण करण्याबरोबरच दोन महिलांसोबत बलात्कार केल्याचा आरोपही केला आहे.
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, चार पर्यटक आणि एक होमस्टेची मालक सनापुर येथील दरीजवळ फिरण्यासाठी आले होते. तेव्हा तीन जण बाईकवरुन आले आणि पेट्रोल पंपबद्दल विचारायला लागले. तेव्हा होमस्टेची संचालक हिने इथे जवळपास पेट्रोल पंप नाहीये असं सांगितले. तेव्हा त्यांनी पाच जणांना धमकवण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडून पैसे मागितले. आरोपी कन्नड आणि तेलगू भाषेत बोलत होते. त्यानंतर आरोपींनी तिन्ही पुरुषांना मारहाण आणि शिवीगाळ करत जबरदस्ती कालव्यात फेकले.
पिडितेच्या तक्रारीनुसार, त्यांचे तिन्ही मित्र कालव्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होते तेव्हा तिन्ही आरोपींनी तिच्यावर आणि इजराईल महिलेवर बलात्कार केला. या घटनेनंतर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. शुक्रवारी सकाळी पोलिसांच्या विशेष पथकाने डॉग स्कॉडच्या मदतीने बेपत्ता तरुणाचा शोध घेतला. मात्र शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. पोलिस आता आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
