पुणे /महान कार्य वृत्तसेवा
सुसंस्कृत पुण्यात नक्की झालंय तरी काय? असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहेत. विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून गेल्या काही दिवसांतून धक्कादायक घटना समोर येत आहेत. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुण भरदिवसा रस्त्यावरील दुभाजकावर लघुशंका करत अील चाळे करत असल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर तीव संताप व्यक्त करण्यात येत आहे.
एका श्रीमंत घरातील तरुणानं भर रस्त्यात आलिशान गाडी उभी करुन रस्त्यावरील दुभाजकावर लघुशंका केलीये.. दारुच्या नशेत हा तरुण भर रस्त्यात अलि चाळेही करत होता.. सकाळच्या सुमारास पुण्यातील येरवडा भागातल्या शास्त्रीनगर चौकात हा प्रकार घडला आहे. गंभीर बाब म्हणये यावेळी रस्त्यावरु महिलाही प्रवास करत होत्या. मात्र महिलांसमोरच या मद्यधुंद तरुणाचे अलि चाळे सुरु होते. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
या विकृतीला कडक शासन करायला पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी शक्ती कायदा संदर्भात मसुदा केला आहे. केंद्रातील काही कायदे बदल झाला आहे. त्यामुळे फेरसादर केला जाईल. तसेच पाऊल नवीन कायद्यात उचलले जातील. महिलांवर होणाऱ्या घटना आहेत त्याला चाप बसेल, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
