जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा
सांगली कोल्हापूर महामार्गावर असलेल्या जयसिंगपूर बस स्थानक महामार्ग लगतच असल्याने एसटी बस बाहेर पडताना दक्षिणेच्या बाजूला रस्ता असल्याने रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून पूर्व, पश्चिम बाजूने एसटी आत व बाहेर येण्यासाठी रस्त्याची व्यवस्था करावी अशी मागणी वाहनधारकांमधून पुढे येत आहे.

महामार्ग लगतच येथील बस स्थानक असल्याने येथील बस स्थानकातून एसटी बस बाहेर पडत असताना स्थानकाच्या दक्षिण बाजूने रस्त्यावर येतात या दरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते वारंवार एसटी बस बाहेर पडताना रस्त्यावर आडवे येत असल्याने दिवसभर या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते त्यामुळे कोल्हापूर इचलकरंजी कडून येणारी वाहने पश्चिमेकडून पूर्वेकडे तर सांगली मिरजेकडून येणारी वाहने पूर्वेकडून पश्चिमेकडे या पद्धतीने आत व बाहेर येण्यासाठी रस्त्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
दिवसाला या बस स्थानकातून एसटी बसेच्या 1700 फेऱ्या आहेत. तर या महामार्गावरून वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने दिवसभर महामार्गावर नगरपालिका ते झेले चित्रमंदिर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात यामुळे संबंधित प्रशासनाने एसटी आत व बाहेर जाण्यासाठी पूर्व पश्चिम मार्गाचा अवलंब करावा .
–संजय शिंदे, अध्यक्ष शिरोळ तालुका आरपीआय