Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
शिवसेनेमध्ये तीन वेळा आमदार आणि दोन वेळा उपसभापती होऊन सुद्धा शिवसेना शिंदे गटामध्ये गेलेल्या नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय रणकंदन सुरु झालं आहे. पदांच्या बदल्यात मर्सिडीज द्यावी लागत होती असं गोऱ्हे यांनी वक्तव्य केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून ठाकरी शैलीमध्येच समाचार घेण्यात आला आहे. मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाचा नेत्या किशोरी पेडणेकर यांनी अक्षरश: मातोश्रीवरील कुंडलिकच बाहेर काढत ही नालायक बाई म्हणत जोरदार प्रहार केला. आजपर्यंत महापौरपर्यंत गेलो पण आमचा पेढाही उद्धव ठाकरे यांनी घेतला नाही, ही बाई पिऊन बसली होती का? अशी विचारणा किशोरी पेडणेकर यांनी केली. या बाईला साहित्यिक परिषदेत कोणी भांडायला लावलं? कोणाची सुपारी घेतली? अशी विचारणा त्यांनी केली.
नाव गोऱ्हे असले तरी काम काळे
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की ती माझी सहकारी कधीच नव्हती, नाव गोऱ्हे असले तरी काम काळे आहे. स्वत:ला हुशार समजणारी ही बाई काय वेळ न बघता बरळल्याचा हल्लाबोल पेडणेकर यांनी केला. पेडणेकर पुढे म्हणाल्या की तीन वेळा आमदार दोन वेळा उपसभापती झालेल्या या बाईने किती मर्सिडीज दिल्या आणि कोणाला दिल्या हे सांगावं. तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला गेला तर साहित्यिकांच्या कार्यक्रमाला गेला. समाजाला दिशा देणारी माणसं म्हणजे साहित्यिक असतात. मात्र, बाई जाऊन बरळल्याचे पेडणेकर म्हणाल्या. या नालायक बाईला काय म्हणायचं असा हल्लाबोल सुद्धा किशोरी पेडणेकर यांनी केला.
सतत मातोश्रीवर बसलेली असायची आणि बोलायची थांबावं लागेल
त्या पुढे म्हणाल्या की, मुळात एक नंबरची ही खोटारडी बाई आहे. शिव्या घालायच्या लायकीची नाही. सतत मातोश्रीवर बसलेली असायची आणि सतत बोलायची थांबावं लागेल, तू होतीस कोण आणि तू करतेस काय? असा प्रहारही त्यांनी केला. महिला आघाडी वाढवण्यासाठी कधीच काही केलं नाही. किशोरी पेडणेकर आपल्या कार्यक्रमाचा एक साडीचा किस्सा सांगितला. पेडणेकर म्हणाल्या की मी एका कार्यक्रमासाठी बोलावलं तर माझ्याकडे साडी मागितली. मी दिली तर मला ती परत केली. मला ही साडी पाहिजे, अशी साडी पाहिजे असं सगळं होतं अशी टीका त्यांनी केली. बाळासाहेब साहित्यिकांना मान द्यायचे, तीच धुरा उद्धव साहेबांनी वाढवण्याचे काम केल्याचे पेडणेकर म्हणाल्या.