इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
मा. उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्या २४ फेब्रुवारी रोजी पार पडणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने २४ ते २८ फेब्रुवारी या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, रवि रजपूते यांचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा केला जाणार असल्याने लक्षवेधी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रवी रजपूते यांचा २४ फेब्रुवारीस वाढदिवस असल्याने या दिवशी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. प्रत्येक रक्तदात्यास उचित सन्मान केला जाणार आहे याच दिवशी सकाळी १० वाजता कामगार चाळ येथे श्री दुर्गामाता मंदिर जिर्णोध्दार पायाभरणी आमदार राहूल आवाडे, शिवसेना जिल्हा अध्यक्ष रविंद्र माने यांच्याहस्ते होणार आहे. याचवेळी सांस्कृतीक भवनाचाही पायाभरणी पार पडणार आहे. सुमारे तीस लाख रूपये खर्चाचे हे काम आहे. तसेच सकाळी ११ वाजता जेष्ट्र नागरीकांचा सत्कार व कृतज्ञता सोहळा पार पडणार आहे. लिंबू चौक काडापूरे तळ भागात २५ फेब्रुवारीस सकाळी ९ वाजता समाधार वृध्वाश्रमास जीवनावश्यक भेट वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. याच दिवशी सकाळी साडेनऊ वाजता लहान मुलांना गिफ्ट दिले जाणार आहे. तर २६ फेब्रुवारीस सकाळी १० वाजता आय.जी. एम. रुग्णालयात चंद्रशिला अॅकॅडमीतर्फे रुग्णांना फळांचे वाटप केले जाणार आहे. याचवेळी स्वी रजपूते जनसंपर्क कार्यालयाजवळ निराधार महिलांना साडीचे वाटप केले जाणार आहे. तर २७ फेब्रुवारीस सकाळी १० वाजता दिव्यांगासाठी भेटवस्तूंचे वितरण केले जाणार आहे. तर वाच दिवशी सकाळी १० वाजता चिकोडी गल्ली येथे बोअर खुदाई केली जाणार आहे. याशिवाय, २८ फेब्रुवारीस हाफपीच क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे खासदार धैर्यशील माने माजी आमदार सुरेश रावणकर माजी मंत्री प्रकाश आवाडे या सगळ्या कार्यक्रमांना सगळ्यांनी
अगत्यपूर्वक उपस्थित रहावे, शेवटी मा. उपनगराध्यक्ष रवि रजपूते २५ फेब्रुवारी सकाळी १ ते ३ वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारतील. हार-तुरे ऐवजी शैक्षणीक साहीत्य बह्या यांचे असे आवाहन रवी रजपूते वाढदिवस गौरव समितीतर्फे करण्यात आले आहे.